गुवाहाटीमधील क्रिकेट फॅन्सने मागितली ऑस्ट्रेलिया संघाची माफी

0 424

गुवाहाटी | ऑस्ट्रेलियन संघाने गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. जेव्हा या विजयानंतर संघ आपल्या हॉटेलकडे रवाना होत होता तेव्हा कुणीतरी संघाच्या बसवर दगड केली.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचने बसच्या फुटलेल्या काचेचा फोटो ट्विटरवर शेअरकरत नाराजगी व्यक्त केली. यानंतर अनेक खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी ही भारताची संस्कृती नसल्याचे सांगितले होते.

आज गुवाहाटी शहरातील अनेक क्रिकेटप्रेमी ऑस्ट्रेलिया संघ थांबला असलेल्या हॉटेल समोर येऊन सॉरी ऑस्ट्रेलिया असा फलक घेऊन उभे होते. तसेच अनेक फॅन्स हे विमानतळावरही असे फलक घेऊन झाल्या प्रकाराबद्दल ऑस्ट्रेलिया संघाची माफी मागताना दिसले.

अनेक चाहत्यांनी ट्विट करून आसाममधील नागरिक असे नाहीत आम्ही पाहुण्यांचे चांगले स्वागत करतो. झाल्या चुकीबद्दल माफ करा असे ट्विट ऍरॉन फिंचला केले आहेत.

या दोनही प्रकारामुळे भारतीय लोक हे क्रिकेट आणि क्रिकेटपटू यांच्यावर किती प्रेम करतात हे सिद्ध झाले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक तिसरा टी२० सामना हैद्राबाद येथे १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: