आयपीएल मधील सर्वात वेगवान चेंडू…

आयपीएल २०१७ मध्ये विविध रेकॉर्ड नव्याने बनले. त्यात वेगवान अर्धशतक, डावात सर्वात कमी धावा अशा काही विक्रमांचा समावेश आहे. परंतु सर्वात वेगवान चेंडू या आयपीएल मध्ये कुणी टाकला हे जाणून घेणंही तेवढंच महत्वाचं.

भारतात खेळपट्ट्या ह्या फिरकीला साथ देणाऱ्या असतात. त्यामुळे वेगवान गोलंदाजांच्या विक्रमांकडे तसं चाहते विशेष लक्ष देत नाहीत.

ह्या आयपीएलमध्ये पॅट कमिन्सने प्रतितास १५३.५६ किलोमीटर वेगाने टाकला. विशेष म्हणजे वेगवान चेंडू टाकणाऱ्या पहिल्या ५ गोलंदाजात कमिन्स दोन वेळा आहे. या यादीत एकही भारतीय गोलंदाज नाही. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू २०१२ साली डेल स्टेनने टाकला होता. त्यानंतर पॅट कमिन्सने टाकलेला हा चेंडू आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू आहे.

आयपीएल २०१७ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकणारे गोलंदाज

१५३.५६ पॅट कमिन्स
१५०.९० लोकी फेर्ग्युसन
१५०.६७ कॅगिसो रबाडा
१५०.५७ बिली स्टॅन्लेक
१५०.४८ पॅट कमिन्स