रोहित शर्माचे खणखणीत अर्धशतक, भारत ० बाद ८४

इंदोर । येथे सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने भारतीय संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाने ५० षटकांत केलेल्या २९३ धावांचा पाठलाग करत आहे.

रोहितने जबदस्त फटकेबाजी करत ४२ चेंडूत ५० धावा केल्या. यात त्याने ४ षटकार आणि ३ चौकार खेचले. अर्धशतक करताना रोहितने सामन्यातील वैयक्तिक ४था षटकार खेचला. त्याचे हे वनडे कारकिर्दीतील वैयक्तिक वेगवान अर्धशतक आहे. तसेच त्याचे हे वनडे कारकिर्दीतील ३३वे अर्धशतक आहे.

विशेष म्हणजे २०१३ पासून वनडेत रोहित तब्बल ११३ षटकार खेचले आहे. हाही एक मोठा विक्रम आहे तर २०१७ या वर्षात रोहितने १९ षटकार वनडे सामन्यात खेचले आहे.