त्या ६२ धावा हिटमॅन रोहितचे नाव कांगारुंच्या भूमीत सुवर्णाक्षरांनी लिहीणार

एडलेड | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे.

पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. परंतु संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

असे असले तरी त्या सामन्यात रोहितने शानदार कामगिरी करताना अनेक विक्रम केले. दुसऱ्या सामन्यातही रोहितला अशीच कामगिरी करण्याची संधी आहे.

या सामन्यात रोहितने जर ६२ धावा केल्या असत्या तर ऑस्ट्रेलियात वनडे वेगवान १ हजार धावा करणारा खेळाडू बनणार आहे.

यापुर्वी विंडीजचे महान फलंदाज व्हीव्हीयन रिचर्ड यांनी ऑस्ट्रेलियात वनडेत १९ डावात १ हजार धावांचा टप्पा पार केला होता.

सध्या रोहितच्या नावावर ऑस्ट्रेलियात वनडेत १७ डावात ९३८ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

त्या फलंदाजाच्या बाद होण्यावर उभा राहिला मोठा वाद, काय झाले नक्की?

कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित

होय, विश्वचषकासाठी धोनीबरोबर हा खेळाडू जाणार इंग्लंडला