टॉप ३: वडील आणि त्यांची दोन मुले जी देशासाठी कसोटी क्रिकेट खेळली !

जगात सर्वात जास्त विक्रम कोणत्या खेळात होत असतील तर त्याच नाव क्रिकेट असं आहे. अगदी एका एका सामन्यात ५०-६० विक्रम तर असेच होतात. अगदी विश्वविक्रमी धावांपासून ते नात्यांपर्यंत अनेक विक्रम या खेळात पाहायला मिळतात.

अनेक खेळात आजपर्यँत आपण दोन भाऊ, बहिणी किंवा वडील- मुलाला खेळताना पहिले आहे. अगदी क्रिकेटमध्येही वडील आणि मुलगा आपण आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळलेलं पाहिलं आहे. तर आज आपण असाच एक खास विक्रम पाहणार आहोत ज्यात वडील आणि त्यांच्या दोन मुलांनी आंतरराष्ट्रीय स्थरावर देशासाठी क्रिकेट खेळले आहे.

#१ लाला अमरनाथ
लाला अमरनाथ हे भारताकडून हे भारत स्वातंत्र्य झाल्यांनंतरचे भारताचे पहिले कर्णधार. त्यांनी २४ कसोटी सामन्यांत ८७८ धावा करताना ४५ विकेट्स घेतल्या. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पाहिलं शतक करण्याचा मान हा लाला अमरनाथ यांना जातो. त्यांनी विश्वयुद्धापूर्वी ३ आणि नंतर २१ असे एकूण २४ सामने खेळले होते.

त्यांचे थोरले पुत्र सुरिंदर अमरनाथ भारताकडून १० कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळले. त्यांनी कसोटीमध्ये ५५० तर एकदिवसीय सामन्यात १०० धावा केल्या.

लाला अमरनाथ यांचे दुसरे पुत्र मोहिंदर अमरनाथ यांना भारतीय क्रिकेटमधील दिग्गज माजी क्रिकेटपटूंपैकी एक समजले जाते. ६९ कसोटी आणि ८५ एकदिवसीय सामने ते भारताकडून खेळले. १९८३ साली भारत जेव्हा प्रथम विश्वचषक जिंकला तेव्हा मोहिंदर अमरनाथ हे मालिकावीर ठरले होते. कसोटीमध्ये १७८२ धावा आणि ३१ विकेट्स तर एकदिवसीय सामन्यांत १९७१ धावा आणि ४६ विकेट्स अशी आंतरराष्ट्रीय स्थरावर त्यांची कामगिरी राहिली आहे.

#२ वॉल्टर हॅडली
ज्यांच्या नावाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड यांच्यादरमण्यान चॅप्पेल- हॅडली कसोटी मालिका खेळवली जाते, त्या हॅडली कुटुंबाचे प्रमुख अर्थात वॉल्टर हॅडली. त्यांनी न्यूझीलँड कडून ११ कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी ५४३ धावा केल्या. त्यांना ५ मुले होती त्यातील ३ मुले देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली.
त्यातील धाकटा मुलगा अर्थात रिचर्ड्स हॅडली यांनी १९७३-१९९० या काळात तब्बल ८६ कसोटी सामन्यात न्यूझीलँडकडून ४३१ धावा करताना ३०००धावा केल्या. वॉल्टर हॅडली यांचे दुसरे पुत्र डेल हॅडली यांनी २६ कसोटी देशासाठी खेळल्या. त्यात त्यांनी ५३० धावा ७१ बळी घेतले. वॉल्टर हॅडली यांचे थोरले पुत्र बॅरी हॅडली यांना मात्र देशाकडून फक्त २ एकदिवसीय सामने खेळता आले. त्यांना देशाकडून कसोटी सामने खेळण्याचं भाग्य लाभलं नाही.

#३ जेफ मार्श

जेफ मार्श यांनी ऑस्ट्रेलियाकडून बरोबर ५० कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी २८५४ धावा केल्या. नंतर त्यांनी प्रशिक्षक आणि निवड समितीचे अध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. ते २०१४ मध्ये केवळ तिसरे क्रिकेटपटू ठरले ज्यांच्या २ मुलांनी देशासाठी क्रिकेट खेळले.

त्यांचा थोरला मुलगा शॉन मार्श याने २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आजपर्यंत शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून २३ कसोटी सामने खेळले असून त्यात १४७६ धावा केल्या आहेत.

जेफ मार्श यांचा दुसरा मुलगा मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू असून त्याने ऑस्ट्रेलियाकडून २१ कसोटी सामन्यात ६७४ धावा करताना २९ विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत.

विशेष म्हणजे जेफ मार्श यांची मुलगी मेलिसा मार्श ही बास्केटबॉल खेळाडू होती.