जेव्हा जपानमध्ये अवतरतो बार्सेलोनाचा संघ

”बार्सेलोना-मोअर दयान ए क्लब”असे बिरुद असणाऱ्या बार्सेलोना संघाने जपानमध्ये प्रवेश केला. जगभरात चाहता वर्ग असणारा बार्सेलोना फुटबॉल संघ जपानमध्ये खूप लोकप्रिय आहे. तेथील चाहते बार्सेलोना संघाच्या तिथे येण्यामुळे खूप उत्साही आहेत.

बार्सेलोना फुटबॉल संघाची नवीन प्रायोजक असणारी जापनीज कंपनी ”राकूटेन”याची टोकियो शहरात पत्रकार परिषद झाली, त्याला बार्सेलोना संघातील प्रमुख खेळाडूंनी हजेरी लावली होती. पत्रकार परिषदेत खेळीमेळीचे वातावरण होते. खेळाडूंनी पत्रकारांच्या प्रश्नाची मोकळेपणाने उत्तरे दिली.

एका प्रश्नाचे उत्तर देताना लिओनेल मेस्सी म्हणाला,”आम्ही या वर्षी सर्व विजेतेपद जिंकू. मी खूप उत्साही आहे परत मैदानावर यायला, नवीन प्रशिक्षकांना भेटायला आणि क्लब सोबत आणखी एका नवीन वर्षाचा आनंद लुटायला.”

महास्पोर्ट्स टेक

” राकुटेंन” हे नवे प्रायोजक बार्सेलोना संघाला मिळाले आहे. ”राकुटेन” या जापनीज शब्दाचा मराठीत अर्थ जरी आशावादी असला तरी या वर्षीचे सर्व विजेतेपदं जिंकणे खूप अवघड काम आहे. नजीकच्या काळात जरी बार्सेलोना संघाने अशी कामगिरी करून दाखवली असली तरी सध्या त्यांचा जवळ प्ले मेकर मिडफिल्डरची कमतरता आहे. पण मेस्सी ,नेमार, सुआरेज या त्रिकुटाने २०१५ साला सारखा खेळ दाखवला तर ते तो करिश्माला पुन्हा करू शकतील.