रॅंन्को पोपोवीक यांची एफसी पुणे सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड

पुणे, दि २५ सप्टेंबर२०१७ – राजेश वाधवान यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीगमधील फ्रॅंचाईजी एफसी पुणे सिटी संघाने रॅंन्को पोपोवीक यांच्या नावाची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणुन घोषणा केली. निवडीबरोबर या सरबीयनने एफसी पुणे सिटी संघासह २०१७-१८ च्या इंडियन सुपर लीगमध्ये व्यावसायीक पदार्पन केले आहे.

पोपोवीक यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलीयन क्लब टस(TuS) एफसी अर्नफेल्स यांच्यासह आपल्या व्यावसायीक कारकिर्दीला सुरूवात केली. यानंतर ऑस्ट्रेलीयाच्याच एफ सी पंचेर्न संघासोबत २००४ ते२००६पर्यंत काम केले. २००६ मध्ये त्यांनी जे १ लीगमध्ये सनफ्रेकस हिरोशिमाची सूत्रे हाती घेतली. २००९ साली आपल्या मायदेशी परतून सर्बीयन सुपर लिगा मध्ये एफसी स्पारटक सुबोतीका संघाचे प्रशिक्षक म्हणुन काम पाहिले.

पोपोवीक यांनी जपानच्या ओइया ट्रिनिटा, एफसी मखीदा झेलविया, एफसी टोकिओ या संघांचे व्यवस्थापकीय संचालक होते. याशिवाय जपानमधील लीग फुटबॉलमधील सर्वात बलशाली संघांपैकी एक असलेल्या सेरेझो ओसाकाचे संघाचेही त्यांनी व्यवस्थापक म्हणुन काम केले. क्लबने उरुग्वेचा स्टार खेळाडू डिएगो फोरलॉनशी करार केला तेव्हा त्याच्या व्यवस्थापकीय आराखडयात ते होते. आपल्या काळात जपानमध्ये त्यांनी अनेक तरुण खेळाडूंना पदोन्नती दिली ज्यांनी पुढे राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले.

दोनवेळा त्याच्या संघांनी लीगमध्ये सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम केला.
२०१४-१५ मध्ये ते सेगुंडा डिवीजन क्लब रिअल झारागझोचे प्रशिक्षक म्हणून स्पेनला गेला आणि तेथे त्यांच्या संघाने ला लीगा प्ले-ऑफच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. काही काळानंतर त्यांनी थाई प्रीमियर लीग चॅम्पियन्स मध्ये सहभाग घेतला व बेरुराम युनायटेड एफसी संघाने थायलंड लीग कप आणि मेकाँग क्लब चॅम्पियनशिप जिंकली.

एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल म्हणाले की, “संघाला १५ वर्षाचा व्यावस्थापनाचा प्रदिर्घ अनुभव असलेले प्रशिक्षक लाभले आहेत. पोपोवीक यांनी विविध लिग मध्ये प्रशिक्षक म्हणुन काम पाहिले आहे. आशियातील विभिन्न सांस्कृतीक वातावरणात व फुटबॉल पर्यावरणात त्यांनी यशस्वीरीत्या काम केले आहे. एफसी पुणे सिटी संघासाठी त्यांचा अनुभव अत्यंत लाभदायक ठरणार आहे. रँके बहुभाषिक आहेत आणि युवा खेळाडूंच्या विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. पुणे येथे त्यांच्यासोबत वेळ घलवताना माझ्या असे लक्षात आले की, फुटबॉल खेळाविषयीचे त्यांचे सखोल ज्ञान, यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आणि भारतीय कर्मचार्यांशी अखंडपणे काम करण्याची क्षमता या गोष्टींनी मी प्रभावित झालो.”

संघातील आपल्या निवडीबीबत बोलताना रॅंन्को पोपोवीक म्हाणाले की, एफसी पुणे सिटी संघातील निवडीमुळे मी आनंदी आहे. क्लबमधील सर्व लोक, त्यांची क्लबसंदर्भातील स्वप्ने, क्लबचा एकत्रितपणे विकास करण्याची त्यांची इच्छा यामुळे संघ पुर्ण क्षमतेने बांधला गोला आहे. यामुळे संघाला खाली खेचणे कठिण आहे. मी संघामध्ये लवकरात लवकर कार्यरत होऊ इच्छीतो असेही पोपोवीक म्हणाले.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-

# एफसी पुणे सिटी संघाचे या अदोगरचे प्रशिक्षक अंतोनिओ हब्बास हे होते.

# अंतोनिओ हब्बास यांनी इंडियन सुपर लीगच्या पहिल्या आणि दुसऱ्या मोसमाचे विजेतेपद मिळवले होते.  पाहिल्या मोसमात ते अथलेटिको डी कोलकता या संघाचे प्रशिक्षक होते तर दुसऱ्या मोसमात ते चेन्नईयन एफसी या संघाचे प्रशिक्षक होते.

# तिसऱ्या मोसमात ते एफसी पुणे सिटी संघाचे प्रशिक्षक झाले.  या मोसमात ते पुणे संघाला उपांत्यफेरी पर्यंन्त देखील घेऊन जाऊ शकले नाहीत. चौथ्या मोसमाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपण यावर्षी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार नाही, असे त्यांनी एफसी पुणे सिटी व्यावस्थापनाला कळवले होते.