एफसी पुणे सिटी संघाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राफेल लोपेज गोमेज व चेस्टरपॉल लिंगडोह यांनी पटकावली 2 पारितोषिके

पुणे । आयएसएल स्पर्धेत उपांत्य फेरीत झेप मारून उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राजेश वाधवान समुह व बॉलिवूडसुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी खास पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन राजेश वाधवान समुहा तर्फे करण्यात आले होते.

एफसी पुणे सिटी संघाचा राफेल लोपेज गोमेज याने प्लेअर्स प्लेअर ऑफ द इयर, मोस्ट कन्सीस्‌टंट प्लेअर ऑफ द इयर अशी, तर चेस्टरपॉल लिंगडोह याने प्लेअर्स प्लेअर ऑफ द इयर, बेस्ट प्लेअर ऑफ द इयर ऑन लोन अशी 2 पारितोषिके पटकावली.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. 2017-18 या मौसमातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे हे पारितोषिक वितरण करण्यात आले होते. यावेळी संघाचे प्रशिक्षक रँको पोपोविच, एफसी पुणे सिटीच्या संघातील खेळाडू आदि मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यातील उत्साह वाढवण्यासाठी कौतुकाची थाप आवश्यक आहे. यासाठीच विशेष पारितोषिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले.

प्लेअर्स प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार तसेच मोस्ट कन्सीस्‌टंट प्लेअर ऑफ द इयर हे दोन पारितोषिक एफसी पुणे सिटी वरिष्ठ संघाच्या राफेल लोपेज गोमेजने पटकावले. स्पेशल कॉंट्रीब्युशन पुरस्कार सेनोरिटा नॉंगप्लुह हिने पटकावला. सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार विशाल कैथ याला देण्यात आला. फॅन्स फेव्हरेट पुरस्कार मार्सिलिनो लिएटे याला देण्यात आला.

पुरस्कार प्राप्त खेळाडूंची यादी खालीलप्रमाणेः
प्लेअर्स प्लेअर ऑफ द इयरः
वरिष्ठ संघः राफेल लोपेज गोमेज
रिझर्व्ह संघः चेस्टरपॉल लिंगडोह
18वर्षाखालील संघः मार्क झोथानपुईया;
13वर्षाखालील संघः विआन मुरगोड;
महिला संघः मुरियल ऍडम;

फॅन्स प्लेअर ऑफ द इयरः मार्सिलिनो लिएटे;

एमर्जींग(उद्योन्मुख)प्लेअर ऑफ द इयरः
वरिष्ठ संघः साहिल पन्वर, गुरतेज सिंग;
अकादमी संघः इशान डे;

मोस्ट कन्सीस्‌टंट प्लेअर ऑफ द इयरः राफेल लोपेज गोमेज;

फिटेस्ट(तंदरूस्त)ऑफ द इयरः दिएगो कार्लोस्‌;

बेस्ट प्लेअर ऑफ द इयर ऑन लोनः चेस्टरपॉल लिंगडोह;

स्पेशल कॉंट्रीब्युशन पुरस्कारः सेनोरिटा नॉंगप्लुह;

प्लेअर ऑफ द इयरः
वरिष्ठ संघः मार्सिलिनो लिएटे;
रिझर्व्ह संघः अनुज कुमार;
18वर्षाखालील संघः वुआंग मुरांग;
13वर्षाखालील संघः फ्रँकलिन नाझरेथ;
महिला संघः दर्शना सणस;

गोलकिपर ऑफ द इयरः विशाल कैथ;
सर्वोत्कृष्ट गोल(वरिष्ठ संघ)ः जोनाथन लुका;
कोच ऑफ द इयरः रॉजर ग्राऊ
सर्वोत्कृष्ट संघः 18 वर्षाखालील संघ.