एफसी पुणे सिटी संघाचा दिल्ली डायनॅमोस एफसी संघावर विजय

पुणे विभागातील प्राथमिक फेरीच्या पाचव्या ग्रुपमध्ये एफसी पुणे सिटी (रेझर्व) संघाने पुणे येथे पिरंगुट फुटबॉल मैदानावर दिल्ली डायनॅमोस एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला.

एफसी पुणे सिटी (रेझर्व) संघाचा मिडफिल्डर राहुल यादवने 58 व्या मिनिटाला स्पर्धेतील आपला दुसरा गोल नोंदविला.एफसी पुणे सिटी पाच गेमनंतर अपराजित राहिली आणि गोलरक्षक अनुज कुमारने चारही सामन्यांमध्ये एकही गोल होऊ दिला नाही.

एफसी पुणे सिटी संघचा सामना 23 एप्रिल 2018 रोजी दिल्ली डायनॅमोस एफसी संघाबरोबर आंबेडकर स्टेडियमवर, नवी दिल्ली येथे होणार आहे.