आयएसएलच्या ४ मौसमासाठी एफसी पुणे सिटी संघात किन लुईस, आदिल खान,जुवेल राजा यांचा सहभाग

 

राजेश वाधवान समुह आणि र्‍हतिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आयएसएलच्या चौथ्या मौसमासाठी अव्वल आक्रमक खेळाडू किन लुईस, डिफेंडर वायने वाझ, लालचुमंविया फनाई, मध्यरक्षक आदिल खान, बलजीत सिंग आणि जुवेल राजा या खेळाडूंचा समावेश करून आपला संघ अधिक मजबूत केला आहे.

एक अव्वल आघाडीवीर असलेल्या किन लुईस याने गेल्या मौसमात दिल्ली डायनामोज संघाकडून खेळताना ११ सामन्यांमध्ये ४ गोल केले होते. तसेच, एक उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून गेल्या मौसमात चर्चिलब्रदर्सकडून प्रसिध्दी मिळविलेल्या आदिल खानने याआधी डेंपो, मोहन बगान आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा या संघाकडून आपल्या १४ वर्षाच्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी बजावली आहे. अत्यंत महत्वाच्या अशा मध्यरक्षक फळीमध्ये बलजीत सिंग सहाणी आणि जुवेल राजा संघाला मजबूती देतील. बलजीत सिंगने गेल्या मौसमात चेन्नई एफसीचे प्रतिनिधित्व केले होते. जुवेल राजा ऍटलिटको दी कोलकत्ता संघाकडून खेळला होता.

एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल आणि मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास यावेळी उपस्थित होते. या नव्या खेळाडूंच्या समावेशाबाबत समाधान व्यक्त करताना गौरव मोडवेल म्हणाले की, आम्ही निवडलेले खेळाडू हे अत्यंत नामवंत नसले तरी येत्या काही वर्षात एक उत्कृष्ट संघ तयार करण्याच्या प्रक्रीयेत त्यांची निवड निर्णायक ठरू शकेल. आम्ही आमचे स्वतःचे मार्क्वी प्लेएर तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि अधिक दर्जेदार खेळाडू विकसित करणे हे आमचे लक्ष आहे.

एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हब्बास म्हणाले की, नवे तरूण खेळाडू जिंकण्यासाठी आणि नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. आमच्या संघासाठी हाच खरा टर्निंग पॉईंट ठरेल. आम्ही आता तरूण खेळाडू घेऊन त्यातूनच नजीकच्या चांगले भविष्यात खेळाडू घडविण्याच्या प्रयत्नाता आमचा उद्देश आहे.

एफसी पुणे सिटी संघाने गोलरक्षक विशाल कैथ याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. गुणवान आघाडीवीर आशिक कुरूनीयन यालाही गेल्या मौसमानंत संघात कायम राखण्यात आले आहे. उरूग्वेचा आक‘मक एमिलिआनो अल्फारो याला करारबध्द करून संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

 

संघातील खेळाडूः

 

गोलरक्षकः कमलजीत सिंग;

 

डिफेंडरः हरप्रीत सिंग, निम डोर्जी तमंग, लालचुंमविया फनाई, गुरतेज सिंग, वेन वाझ, पवन कुमार;

 

मध्यरक्षकः अजय सिंग, रोहित कुमार, जुवेल राजा, बलजीत सिंग, आदिल खान, इसाक चाकचुक;

 

फॉरवार्डः किन लुईस;

 

रिटेनः विशाल कैथ(गोलरक्षक), आशिक कुरूनीयन(फॉरवार्ड);

 

परदेशी खेळाडूः एमिलिआनो अल्फारोः