एफसी पुणे सिटीकडून एमिलिआनो अल्फारो करारबध्द

पुणे, १० जुलै २०१७: राजेश वाधवान समुह आणि र्‍हितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडिया सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आगामी मौसमासाठी एमिलिआनो अल्फारो याला करारबध्द करण्यात आले आहे.  याबरोबरच एफसी पुणे सिटी संघाने या मौसमातील पहिला परदेशी खेळाडू करारबध्द केला आहे. उरूग्वे स्ट्रायकर गतवर्षी नार्थ इस्ट युनायटेड एफसीचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे. १३ सामन्यांमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाकडून खेळताना अल्फारोने १३ सामन्यांमध्ये ५ गोल केले होते.

 

अल्फारोच्या संघातील समावेशामुळे एफसी पुणे सिटीचा निश्चितच फायदा होईल, असा आत्मविश्वास एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, अल्फारो हा प्रतिस्पर्ध्याच्या गोलजाळ्यापर्यंत धडक मारण्याचे कौशल्य माहिती असलेला आघाडीवीर आहे. तसेच, संघाच्या आघाडीच्या फळीतील सहकारी खेळाडूंचा त्याला अचूक अंदाज असतो आणि त्यांच्याशी समन्वय साधण्याच्या कौशल्याने आम्ही प्रभावित झालो आहोत. त्याच्या या नव्या मोहिमेसाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि एफसी पुणे सिटी संघात त्याचे स्वागत करतो.

 

अल्फारोने २००६ मध्ये उरूग्वे येथील आघाडीच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रिमियम डिव्हिजन क्लब असलेल्या लिव्हरूपूल एफसी कडून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरूवात केली. त्यानंतर लागोपाठ दोन वर्षे त्याने क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला. २०११ मध्ये अल्फारो इटली विरूध्द मैत्रीपूर्ण लढतीसाठी राष्ट्रीय संघात सहभागी झाला होता. त्याचे खेळातील कौशल्य पाहून त्याला इटालियन क्लब लाझियो संघाने आपल्या संघात दाखल केले आणि या संघाकडून तीन वर्षे खेळला. त्यानंतर २०१४-१५ मध्ये लिव्हरपूल एफसी संघाला सेगूंडा डिव्हिजनमध्ये विजेतेपद मिळवून देण्यात अल्ङ्गारोचा मोलाचा वाटा होता.

 

एफसी पुणे सिटीचे मुख्य प्रशिक्षक अँटोनिओ हबास म्हणाले की, अल्फारो  हा सर्वांगीण कौशल्य असलेला खेळाडू असून एफसी पुणे सिटीच्या फुटबॉल शैलीशी तो अचुक ज़ुळवून घेऊ शकेल, असा आम्हांला विश्वास वाटतो. प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात आक्रमक चाली रचण्याचे आणि त्यासाठी डावपेच आखण्याचे त्याचे कौशल्य वादादीत आहे आणि संघाला गरज भासेल तेव्हा तो बचावपटूंची भूमिका उत्तम बजावू शकतो. त्यामुळेच तो एफसी पुणे सिटीसाठी जमेची बाजू ठणार  आहे.

 

एफसी पुणे सिटी संघात नवी मोहिम सुरू करण्याबाबत अल्फारो म्हणाला की, आयएसएल स्पर्धेमध्ये गेल्या वर्षीचा मौसम माझ्यासाठी चांगला गेला आणि आता नवी आव्हाने शोधण्याची ही योग्य वेळ आहे. एफसी पुणे सिटी संघाचे नियोजन अतिशय उत्तम आहे आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत माझा आगामी मौसम फलदायी ठरेल. तसेच, संघाचे चाहते आणि ऑरेंज आर्मी यांच्यासाठी मी प्रभावी कामगिरी करू शकेल, असा माझा विश्वास आहे.