नव्या मौसमासाठी एफसी पुणे सिटीच्या नव्या जर्सीचे अनावरण

पुणे: राजेश वाधवान समुह आणि बॉलिवूडस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने आज घरच्या व बाहरेगावच्या सामन्यांसाठी 2018-19च्या नव्या मौसमाकरिता नव्या जर्सीची घोषणा केली. मुख्य प्रशिक्षक मिगुल पोर्तुगल आणि संघातील प्रमुख खेळाडूंनी वेस्ट एंड मॉल येथे झालेल्या शानदार सोहळ्यात संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले.

यातील घरच्या सामन्यांची जर्सी गडद नारंगी रंगाची असून पाठीमागची बाजू किंचित फिकट रंगाची आहे. तसेच, बाहेरगावच्या सामन्यांची जर्सी करड्या व पांढर्‍या रंगाचे आकर्षक मिश्रण असलेली अत्यंत हलक्या व सछिद्र टेक्चरपासून सिक्स5सिक्स यांनी बनविलेली आहे. या जर्सीवरील समोरच्या बाजूला नारंगी, पांढर्‍या रंगाचे पट्टे असून त्याच्या मध्यभागी एफसी पुणे सिटी संघाच्या नव्या  बोधचिन्हाचे दर्शन घडणार आहे.

एफसी पुणे सिटी संघाचे मुख्य कार्यकारी गौरव मोडवेल म्हणाले की, गेल्या मौसमातील ऐतिहासिक कामगिरीनंतर यंदाच्या मौसमात संघाच्या सकारात्मक आणि विजयी वृत्तीचे दर्शन या नव्या जर्सीतून घडणार आहे. 2018-19मौसमासाठीची ही जर्सी अत्यंत आगळ्यावेगळ्या लुकची असून याचा नारंगी रंग हा आमची तीव‘‘ ईच्छाशक्ती आणि खेळावरील निष्ठा दाखवून देतो.

तसेच, त्यावरील पट्टे धैर्य, संघाची ताकद आणि जिंकण्याची तीव‘ या गुणांचे प्रतिक आहे. हे नव्या जर्सीचे डिझाईन आमच्या खेळाबाबतच्या तत्वज्ञानाचे नावच म्हणावे लागेल. आमच्या संघाच्या चाहत्यांना ही जर्सी आवडेल आणि या रंगाने ते संपूर्ण स्टेडियम भरून टाकतील, असा आम्हांला विश्वास वाटतो. आमचे ऑफिशियल किट पार्टनर सिक्स5सिक्स यांनी ही जर्सी डिझाईन करताना एफसी पुणे सिटीच्या कामगिरीविषयी दाखविलेल्या दुरदृष्टीमुळे हे सर्व शक्य झाले आहे.

यावेळी बोलताना सिक्स5सिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर अनेजा म्हणाले की,  एफसी पुणे सिटीशी आगामी मौसमाशी संलग्न होताना आम्हांला आनंद वाटत आहे. या क्लबच्या इतिहास  ब्रँडचा इतिहास आणि तत्वज्ञान हे ध्यानात ठेऊनच आम्ही या जर्सीची निर्मिती केली आहे. सध्याच्या किंवा पूर्वीच्या कोणत्याही जर्सीपासून हे नवे डिझाईन पुर्णपणे आगळेवेगळे असून क्लबच्या मुलभूत तत्वांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. खेळाडूंची कामगिरी आणि खेळाडूंना मैदानावर खेळताना मिळणारा आराम हे ध्यानात ठेऊनच ही जर्सी तयार करण्यात आली असून ती परिधान करणारे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील.

एफसी पुणे सिटीचे मुख्य पुरस्कर्ते सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ईव्हीपी संजीव राजशेखरन म्हणाले की,  एफसी पुणे सिटीबरोबर काम करताना  सुझुकी जिक्स कंपनीला अत्यंत आनंद होत आहे. एफसी पुणे सिटीला आगामी मौसमासाठी आम्ही शुभेच्छा देतो.

सुझुकी मोटरसायकल इंडिया युवकांचे सामर्थ्य आणि क्षमता यावर विश्वास ठेवणारी आहे आणि एफसी पुणे सिटीशी असलेले संबंध दिर्घकाळ कायम राहतील, असा आम्हांला विश्वास आहे. खिलाडूवृत्ती, खेळातील रोमांच आणि विजय मिळविण्याची इच्छा यांचे प्रतिनिधित्व ही नवी जर्सी करेल आणि  संघाला हे खेळाडू अनेक विजय मिळवून देतील, असा आम्हांला विश्वास वाटतो.

क्रिएटिजिज्‌ कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नवरोज धोंडी यावेळी म्हणाले की, कोणत्याही यशस्वी भागीदारीसाठी सातत्य हा महत्वाचा घटक असतो. त्यामुळेच सुझुकी मोटरसायकल आणि आम्ही या दोघांनाही एफसी पुणे सिटीशी पुन्हा एकदा भागीदारी करताना आनंद होत आहे. गेला संपूर्ण मौसम आम्हा सर्वांच्या भागीदारीसाठी सकारात्मक होते आणि त्यामुळेच आगामी मौसमासाठीही आम्ही उत्सुक आहोत.

वेस्ट एंड मॉलचे कार्यकारी संचालक शशांक पाठक म्हणाले की , एफसी पुणे सिटी संघाशी संलग्न होऊन आम्हांला अतिशय आनंद झाला आहे. वेस्ट एंड मॉलमध्ये नवनव्या उपक्रमांना सादर करण्यास आम्ही उत्सुक असतो. तसेच, आमच्या युवा ग्राहकांना आवड असलेल्या आणि त्यांना आकर्षित करणार्‍या नव्या उपक्रमांसाठी आम्ही उत्सुक असतो.

गेल्या काही वर्षात एफसी पुणे सिटी आणि वेस्ट एंड मॉल या दोघांनीही आपला चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात वाढविला आहे. एफसी पुणे सिटी संघाचे ऑफिशियल मॉल पार्टनर म्हणून आगामी मौसमातही त्यांना पाठिंबा देण्यास आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या निमित्ताने सोशल मिडियावर अनेक कॉंटेस्ट जाहिर करत असून या कॉंटेस्टमधील विजेत्यांना एफसी पुणे सिटी संघाचे घरच्या मैदानावरील सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.