ला लीगा: स्पेन फुटबॉल असोसिएशन ठरवणार अमेरिकेत या संघांना खेळावायचे की नाही

स्पेन फुटबॉल असोसिएशन ला लीगामधील बार्सिलोना, रियल माद्रीद आणि जिरोनाचे सामने अमेरिकेत खेळवायचे की नाही ते ठरवणार आहे. माद्रीदमध्ये झालेल्या स्पेन संघाच्या पत्रकार परिषदेत लीगाचे अध्यक्ष जेवियर टेबॅस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

ला लीगाच्या आयोजकांना 26 जानेवारीला होणारा बार्सिलोना विरुद्ध जिरोना हा सामना उत्तर अमेरिकेत ठेवायचा आहे. मात्र या निर्णयाला स्पेनच्या फुटबॉलपटूंनी विरोध दर्शविला आहे.

फुटबॉल आणि लीगचे प्रसार करण्यासाठी काही सामने हे अमेरिका तसेच कॅनडामध्ये घेण्याचे ठरवले  होते. यावर क्लब्सच्या खेळाडूंनी तसेच अधिकाऱ्यांनी होकार दर्शवला आहे.

यावर बार्सिलोनाचे अध्यक्ष जोसेफ मारिया बार्तोनेयु, जिरोनाचे अध्यक्ष डेल्फ जेल आणि टेबॅस यांनी स्पेन फुटबॉल असोसिएशनसमोर विनंती अर्ज सादर केला आहे.

लीगा असोसिएशनच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी रियल माद्रीदचा कर्णधार सरियो रॅमोस आणि बार्सिलोनाचा कर्णधार लिओनल मेस्सी ला लीगाच्या उरलेल्या १८ संघांच्या कर्णधारांसोबत आज स्पॅनिश फुटबॉलर्स असोसिएशनच्या (एएफई) मुख्यालयात जमले होते.

या क्लब्सच्या असोसिएशनने म्हटले की, “खेळाडूंना याची काही पुर्वकल्पना दिली गेली नाही ते आधी करायला हवे होते. तसेच खेळाडूंच्या म्हणण्यानुसार ते दुसरीकडे सामने ठेवणार होते. पण त्यांनी काही सांगितलेच नाही.”

“आम्ही फुटबॉल, खेळाडू आणि चाहत्यांसाठी या निर्णायावर विचार करत आहोत”, असे बार्सिलोनाचा मिडफिल्डर सरियो बोस्केटने स्पेन संघाच्या पत्रकार परिषदेत म्हटले.

हा सामना खेळणे काही बंधनकारक नाही पण संघाला अटलांटिकमध्ये खेळण्यास ही एक उत्तम संधी आहे. येथे खेळण्याच्या संमतीसाठी ला लीगा आणि बार्सिलोना क्लबला स्पेन फुटबॉल असोसिएशनच्या निर्णयाची वाट पाहवी लागणार आहे.

ऑगस्टमध्येच लीगच्या अधिकाऱ्यांनी ठरवले की युरोपियन स्पर्धा नसलेल्या काळात काही सामने हे जगात कुठेही ठेवले जातील.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

श्रीलंका दौरा: स्म्रीती मानधनाने अर्धशतक करत भारतीय महिला संघाला मिळवून दिला पहिला विजय

स्वित्झर्लंड विरुद्धच्या मैत्रीपूर्व सामन्यास इंग्लंड स्ट्रायकर हॅरी केनला विश्रांती

फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व