फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत आज होणाऱ्या लक्षवेधी लढती

मुंबई । फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेतील साखळी फेरीचा आज शेवटचा दिवस असून या फेरीतील महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे आज सामने आहेत. महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा आज अनुप कुमारच्या हरियाणा संघाशी आज ८:३० वाजता सामना होणार असून सायली जाधवच्या टीम महाराष्ट्राचा सामना ९ वाजताच्या आसपास भारतीय रेल्वे संघाशी होणार आहे.

आज पुरुष आणि महिला गटाचे मिळून एकूण १० सामने होणार आहेत. उपांत्यफेरीसाठी पात्र होण्यासाठी या लढती महत्वाच्या ठरणार आहे.

आज होणारे सामने
पुरुष गट:
सामना क्रमांक-८: सेनादल विरुद्ध कर्नाटक
सामना क्रमांक-९:उत्तरप्रदेश विरुद्ध राजस्थान
सामना क्रमांक-१०: उत्तराखंड विरुद्ध भारतीय रेल्वे
सामना क्रमांक-११: महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा
सामना क्रमांक-१२: उत्तराखंड विरुद्ध सेनादल

महिला गट:
सामना क्रमांक-८: भारतीय रेल्वे विरुद्ध केरळ
सामना क्रमांक-९: हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तरप्रदेश
सामना क्रमांक-१०: केरळ विरुद्ध हरियाणा
सामना क्रमांक-११: पंजाब विरुद्ध छत्तीसगढ
सामना क्रमांक-१२: भारतीय रेल्वे विरुद्ध महाराष्ट्र