अनुप कुमारच्या हरियाणाचा पहिल्या सामन्यात उत्तरप्रदेशवर विजय

मुंबई । फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सामन्यात हरियाणाने उत्तरप्रदेश संघावर असा विजय मिळवला. या सामन्यात अनुभवाच्या जोरावर हरियाणाने उत्तरप्रदेशचा असा पराभव केला.

या स्पर्धेत उत्तरप्रदेशचे नेतृत्व भारतीय संघाचा माजी कर्णधार अनुप कुमार करत आहे. या सामन्यात हरियाणाच्या आक्रमक फळीकडून जेवढा आक्रमक खेळ झाला नाही त्यापेक्षा चांगला खेळ बचाव सुरिंदर नाडा आणि रविंदर पहल यांच्याकडून पाहायला मिळाला. पहलने या सामन्यात ३ सुपर टॅकल करताना आणखी २वेळा चांगलया पकडी केल्या.

पूर्वार्धात हरियाणा संघ हा केवळ ४ गुणांनी आघाडीवर होता. ही आघाडीही संघाला बचाव फाळणीमुळेच मिळाली होती. पूर्वार्धात अनुप कुमार, संदीप नरवाल, मंजीत चिल्लर हे खेळाडू बराच काळ बाहेरच होते.

उत्तरार्धात मात्र हरियाणाकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. यामुळे उत्तरप्रदेश संघावर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. अनुप कुमारचा खराब फॉर्ममधून अजूनही बाहेर न आलेला दिसत आहे. आज त्याकडून सतत एम्प्टी रेड होताना दिसल्या. तो पूर्ण लयीत खेळत नसल्याचे स्पष्ट दिसत होते.अनुप कुमारने एकूण ११ रेडमध्ये ४आणि १गुण टॅकलमधून मिळवला.

उत्तरप्रदेशकडून अवनीश कुमार आणि अभिषेक सिंग यांनी चांगला खेळ केला परंतु तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

परंतु त्याच वेळी बचावात आशिष कुमार आणि रविंदर पहलकडून सुपर टॅकल पाहायला मिळाले. हरियाणाचा पुढचा सामना आजच राजस्थान संघासोबत होणार आहे.