फेडरेशन प्रीमिअर लीग २०१९ क्रिकेट स्पर्धेत रॉयल्स, टिंबर स्ट्रायकर्स संघाचे विजय

पुणे: लक्ष्मी रोड कटारिया रॉयल्स, टिंबर स्ट्रायकर्स या संघांनी पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून उद्घाटनाचा दिवस गाजवला. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. पहिल्या लढतीत लक्ष्मी रोड कटारिया रॉयल्स संघाने मेटल चॅलेंजर्स संघावर ३७ धावांनी मात केली. यात रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १०३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मेटल चॅलेंजर्स संघाला ८ बाद ६६ धावाच करता आल्या. दुस-या लढतीत टिंबर स्ट्रायकर्स संघाने नॉन-फेरस इलेव्हन संघावर ५९ धावांनी मात केली. टिंबर स्ट्रायकर्स संघाने मेहुल राठोडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद १२६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नॉन-फेरस इलेव्हन संघाला ८ बाद ६७ धावाच करता आल्या.
स्पर्धेचे उद््घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांच्या हस्ते झाले. यावेळी शॉ टोयोटाचे महेंद्र शॉ, गार्नेट बिल्डर्स अ‍ँड डेव्हलपर्सचे मनोज ओसवाल, नरेश मित्तल, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, अभय व्होरा, बक्षीसिंग तलवार, निलेश सोनिगरा, ब्रिजेन शहा, निर्मल शहा, संजय खोपडे, अभय गांधी, अरविंद कोठारी, चंदन मुंदडा, सुभाष पोरवाल आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक – १) लक्ष्मी रोड कटारिया रॉयल्स – १० षटकांत ३ बाद १०३ (प्रतीक भोसले नाबाद ३५, अभिषेक परमार २९, गौतम सुंदराणी नाबाद १९, विद्युत जैन १-२०, कीर्तीकुमार ओसवाल १-१८, चिंतन ओसवाल १-१३) वि. वि. मेटल चॅलेंजर्स – १० षटकांत ८ बाद ६६ (आदित्य पोरवाल २१, चिंतन ओसवाल १८, अभिषेक परमार ३-८, जयंत भोसले १-१०).
२) टिंबर स्ट्रायकर्स – १० षटकांत ४ बाद १२६ (मेहुल राठोड नाबाद ५९, अंकित राठोड २३, फैसल शाह २-३१, अतुल ओसवाल १-१३) वि. वि. नॉन-फेरस इलेव्हन – १० षटकांत ८ बाद ६७ (प्रकाश ओसवाल १६, मनीष परमार १४, सितार भंडारी २-१६, तेजस पटेल १-५).