फेडरेशन प्रीमिअर लीग २०१९ क्रिकेट स्पर्धेत पीसीएमए युनायटेड, पाईन पँथर्स संघाचे विजय

पुणे: पीसीएमए युनायटेड, पाईन पँथर्स या संघांनी पुणे व्यापारी महासंघातर्फे आयोजित फेडरेशन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष असून, मुख्य प्रायोजक सिस्का आणि सहप्रायोजक शॉ टोयोटा, गार्नेट बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे आहेत.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी झालेल्या पहिल्या लढतीत पीसीएमए युनायटेड संघाने स्टेनलेस स्टील स्मॅशर्स संघावर ६ गडी राखून मात केली. युनायटेड संघाने स्मॅशर्स संघाला ७० धावांत गुंडाळले. यानंतर विजयी लक्ष्य ७.५ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले.
यानंतर पँथर्स संघाने केमिकल रिअ‍ॅक्टर्स संघावर २६ धावांनी मात केली. यात पँथर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांत ५ बाद ११० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना केमिकल रिअ‍ॅक्टर्स संघाला ५ बाद ८४ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक – १) स्टेनलेस स्टील स्मॅशर्स – १० षटकांत सर्वबाद ७० (जितेश पोरवाल २४, पारस ओसवाल १६, महेश ढोका २-७, भूषण वसुलकर १-७) पराभूत वि. पीसीएमए युनायटेड – ७.५ षटकांत ४ बाद ७१ (रक्षित लोढा ३४, निखिल ओसवाल नाबाद १३, भावेन ओसवाल २-२२, पीयूष राठोड १-८).
 २) पाईन पँथर्स – १० षटकांत ५ बाद ११० (मनीष शहा ३७, राहुल जैन ३२, जयेश ओसवाल १-७, अमित शहा १-९) वि. वि. केमिकल रिअ‍ॅक्टर्स – १० षटकांत ५ बाद ८४ (जॅकी लोढा २८, जयेश ओसवाल २४, नितेश ओसवाल २-७, पीयूष गुंदेशा २-११).
३) मेपल प्लाय मास्टर्स – १० षटकांत ४ बाद १५६ (हिकांत कामदार ५१, कुणाल शहा ४५, विपूल ओसवाल ३६, योगेश शहा २-३१) वि. वि. पिस्मा इलेव्हन – १० षटकांत सर्वबाद ७९ (योगेश शहा २०, कुणाल शहा २-११, विराल पटेल २-५).
४) पाडा वॉरियर्स – १० षटकांत ८ बाद ७९ (चरणजितसिंग २१, सुजित भटेवरा २-११, जॅकी लोढा २-१३) पराभूत वि. केमिकल रिअक्टर्स – १० षटकांत ५ बाद ८५ (रोहन १८, जॅकी लोढा १७, सचिन शहा २-१८).
५) मशिनरी मास्टर्स – १० षटकांत ३ बाद ५४ (सुनील फाळके नाबाद २७, गौरव शहा १५, सतिश ओसवाल १-५, नितीन पंडित १-७) पराभूत वि. फॅशन फायटर्स – ४.४ षटकांत १ बाद ५५ (विक्रम कांबळे नाबाद ३५, नितीन पंडित १२, अजय वाव्हळ १-८).