यूएस ओपन: रॉजर फेडररच्या नावे एक खास विक्रम

रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७मध्ये एकही सेट न हारता विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकला. परंतु अमेरिकन ओपनमध्ये पहिल्या फेरीपासून या दिग्गजाला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

पहिला सामना ५ सेटमध्ये जिंकल्यावर दुसराही सामना फेडररला ५ सेटपर्यंत खेळावा लागला. रशियाच्या मिखाइल यौझुनीला पराभूत करताना फेडररची चांगलीच दमछाक झाली. परंतु अखेर अनुभवी फेडररने या खेळाडूवर मात मिळवली.

जरी फेडररला या सामन्यात संघर्ष करायला लागला तरी फेडरर आजकाल जो कोणता सामना खेळतो त्यात काही ना काही विक्रम होतो. कालच्या सामन्यातही त्याने एक खास विक्रम केला आहे.

अमेरिकन ओपनमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फेडरर आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. फेडररने या स्पर्धेत ८० सामने जिंकले आहे. त्याने आंद्रे आगासीचे ७९ विजयाचे रेकॉर्ड मोडले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक विजय जिमी कॉनर्स यांनी मिळवले आहेत. त्यांनी तब्बल ९८ विजय या स्पर्धेत मिळवले आहेत.