फेडरर दुबई ओपनच्या दुसऱ्या फेरीत

 

ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदानंतर प्रथमच खेळत असलेल्या दुबई ओपन स्पर्धेत रॉजर फेडररने बेनोइट पेअरवर ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.ऑस्ट्रेलियन ओपनचे स्वप्नवत विजेतेपद मिळविल्यानांतर ३५ वर्षीय फेडररने नेहमीच्या शैलीत विजयी वाटचाल सुरु केली आहे. दुबई ओपनचा तीन वेळचा विजेता आणि तृतीय मानांकित फेडररला सामन्यात प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा मिळाला.

सामन्यांमध्ये दोन वेळा बेनोइट पेअरमुळे आलेल्या अडथळानंतरही फेडररने हा सामना तासाभरात जिंकला. सामन्यानंतर बोलताना फेडरर म्हणाला कि यापेक्षा चांगली सुरुवात असू शकत नाही. माझी सामन्यादरम्यान खूप वेगवान हालचाल झाली नाही. सर्विस खूप वेगवान होती. रॅली वेगवान होत्या. त्यामुळे विजय विशेष आहे.

वर्ल्ड नंबर १ अँडी मरे याला स्पर्धेत अग्रमानांकन असून त्याचा सामना आज होणार आहे.