विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे

0 50

रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव खेळाडू आहे.

परंतु याबरोबर फेडररने स्वतःचाही एक विक्रम मोडला आहे. एका ग्रँडस्लॅम प्रकारात सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम यापूर्वी फेडररच्याच नावावर होता. फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकूण ८७ विजय मिळवले आहेत. तर अमेरिकन ओपनमध्ये ७८ विजय मिळवले आहे. तसेच ६५ विजय हे फ्रेंच ओपनमध्ये मिळवले आहे.

फेडररचे ग्रँडस्लॅम मधील विजय
८८ विम्बल्डन
८७ ऑस्ट्रेलियन ओपन
७८ अमेरिकन ओपन
६५ फ्रेंच ओपन

Comments
Loading...
%d bloggers like this: