विम्बल्डन: रॉजर फेडररने पहिला सेट जिंकला

१८वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने उपांत्यफेरीच्या सुरु असलेल्या सामन्यात टोमास बर्डिच विरुद्ध पहिला सेट जिंकला आहे. ट्रायब्रेकरमध्ये गेलेला हा सेट फेडररने सर्व अनुभव पणास लावून ७-६(४) असा जिंकला.

फेडररला स्पर्धेत तिसरे तर बर्डिचला ११वे मानांकन आहे. दुसऱ्या सेटमध्येही फेडरर ४-३ असा आघडीवर आहे. नेट जवळचे पॉईंट्स हे फेडररने ७६% घेतले असून बर्डिचने ५८% घेतले आहेत.