आशिष नेहरा आज खेळणार आपला शेवटचा सामना

१९९९ मध्ये कर्णधार अजहरुद्दीनच्या भारतीय संघातून आशीष नेहराने भारतीय संघात प्रवेश केला. नेहरा आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर २००३ पर्यंत भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज बनला.

२००३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने कौतुकास्पद कामगिरी केली होती. आशीष नेहरा हा खूप संयमी आणि विनोदी वृत्तीचा खेळाडू आहे. त्याने आजपर्यंत भारतासाठी १७ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २६ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

आशिष नेहरा हा मोहम्मद अजहरुद्दीन, एम एस धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत खेळलाय. आशिष नेहरा जेव्हा त्याचा पहिला सामना खेळला होता तेव्हा विराट कोहली हा फक्त १० वर्षाचा होता.

आज फिरोजशाह कोटला मैदानावर आशीष नेहरा आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. नेहराने बीसीसीआयला विशेष विनंती केली होती की त्याला त्याचा शेवटचा सामना हा आपल्या घरच्या मैदानावर खेळू द्यावे. बीसीसीआयनेही या गुणी खेळडूची ही ईछा पूर्ण केली.

आशिष नेहराला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -२० मालिकेसाठी निवडले गेले होते पण पहिल्या दोन सामन्यांत त्याला शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळाले नव्हते.

क्रिकेट मधून निवृत्त होताना नेहरा म्हणाला की जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार ही जोडगोळी चांगली गोलंदाजी करीत आहे आणि त्यांना यापुढे भारतासाठी गोलंदाजीची करण्याची पूर्ण जबाबदारी देणे आवश्यक आहे.

नेहरा २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा खूप महत्वाचा सदस्य होता. त्याने उपांत्यफेरीमध्ये चांगली गोलंदाजी केली परंतु बोटाच्या दुखीपतीमुळे तो अंतिम सामना खेळू शकला नाही. आशीष नेहराची १९ वर्षांची दैदिप्यमान कारकीर्द आज संपेल.

दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदान देखील आशिष नेहराच्या निवृत्तीची जंगी तयारी करत आहे. ‘फेरवेल आशिष नेहरा’ असे मैदानाच्या स्टँड्सवर दिसून येत आहे.

.  

सचिन आमुणेकर
(टीम महा स्पोर्ट्स)