कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू

नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.

पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० कसोटी सामने झाले आहेत. त्यात १०पैकी १० वेळा फलंदाज करणारा संघ पराभूत झाला होता.

परंतु एखाद्या कसोटी सामन्यात एका संपुर्ण दिवसात कमीतकमी किती चेंडू टाकले असतील तर आहेत केवळ २.

१९३७ साली शेवटच्या दिवशी दोन विकेट बाकी असताना आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात दोन चेंडूंवर या विकेट्स गेल्या.

तर १९६५मध्ये शेवटच्या दिवशी विंडीज संघाने आॅस्ट्रेलियाला संघाची शेवटची विकेट केवळ २ चेंडूत घेत सामना जिंकला होता.

पावसामुळे सामन्यात कमी चेंडू टाकण्याचे प्रकार अनेकवेळा झाले. परंतु १९९२मध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात दुसऱ्या दिवशी केवळ दोन चेंडू टाकले गेले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

बुमराह आणि नो बाॅल…टायटॅनिकपेक्षाही भारी लव्हस्टोरी….

इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी