हाशिम अमलाने मोडला कोहलीचा हा मोठा विक्रम

आज दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सामन्यात आफ्रिकेच्या अमलाने ९९ चेंडूत १०० धावांची खेळी करताना भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला. वनडेत २६ शतके करण्यासाठी अमलाने केवळ १५४ डाव घेतले.

पूर्वी हा विक्रम विराटच्या नावावर होता. विराटने १६६डावात २६ शतके केली होती. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ही कामगिरी करायला २४७ डाव लागले होते.

वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अमला आता ५व्या स्थानी आला आहे.

वनडेत सर्वात कमी डावात २६ शतके करणारे खेळाडू
१५४ हाशिम अमला
१६६ विराट कोहली
२४७ सचिन तेंडुलकर
२८६ रिकी पॉन्टिंग
४०२ सनथ जयसूर्या