रनमशीन विराट कोहली ठरला तेंडुलकर, गावसकरांनाही वरचढ, केला हा मोठा पराक्रम

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे या सामन्यात आज तिसऱ्या दिवशी(16 डिसेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

विराटने 214 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले असून हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील 25 वे शतक आहे. हे शतक त्याने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील 127 व्या डावात पूर्ण केले आहे.  त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25 शतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.

हा पराक्रम करताना त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांनाही मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 25 शतके करण्याचा विश्वविक्रम महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी 68 डावातच 25 कसोटी शतके केली होती. त्यांच्या या विक्रमाच्या जवळ आजपर्यंत एकाही फलंदाजाला पोहचता आलेले नाही.

त्याचबरोबर विराटचे हे आॅस्ट्रेलियातील 6 वे कसोटी शतक आहे. त्यामुळे त्याने आॅस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिननेही आॅस्ट्रेलियामध्ये 6 कसोटी शतके केली आहेत.

सर्वात जलद 25 कसोटी शतके करणारे फलंदाज (डावांनुसार)-

68 डाव – डॉन ब्रॅडमन

127 डाव – विराट कोहली

130 डाव – सचिन तेंडुलकर

138 डाव – सुनील गावसकर

139 डाव – मॅथ्यू हेडन

147 डाव – गॅरी सोबर्स

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..

मी विराटचा आदर करतो, माझ्या ट्विटचा चुकीचा अर्थ घेतला गेला, स्टोक्सने दिले स्पष्टीकरण

गौतमचा प्रशिक्षक रवी शास्त्रींवर ‘गंभीर’ निशाणा

अबब…सहा सामन्यांतच या गोलंदाजाने घेतल्या २९ विकेट्स !

चायनामन गोलंदाज कुलदिप यादवला मास्टर ब्लास्टरने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!