असा एक विक्रम ज्यात अश्विनने हेडली, बोथम, इम्रान खान यांना टाकले मागे !

कोलंबो: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशी अश्विनने आज ९२ चेंडूत ५४ धावा केल्या. याबरोबर त्याने एक खास विक्रम केला.

या खेळाडूने न्युझीलँडचे दिग्गज अष्टपैलू सर रिचर्ड्स हेडली, इंग्लडचे सर इयान बोथम, पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इम्रान खान आणि आफ्रिकेच्या शेन पॉलोकचा मोठा विक्रम मोडला आहे.

२५० कसोटी बळी आणि २००० धावा करण्यासाठी सर्वात कमी कसोटी सामने खेळण्याचा विक्रम आता अश्विनच्या नावापुढे लागला आहे. त्याने ही कामगिरी करायला फक्त ५१ सामने घेतले आहेत. यापूर्वी हा विक्रम न्युझीलँडचे दिग्गज अष्टपैलू सर रिचर्ड्स हेडली यांच्या नावावर होता . त्यांनी ही कामगिरी ५४ कसोटी सामन्यात केली होती.

इंग्लडचे सर इयान बोथम आणि पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इम्रान खान यांनी हा पराक्रम ५५ कसोटी सामन्यात तर आफ्रिकेच्या शेन पॉलोकने हा विक्रम ६० कसोटी सामन्यात केला आहे.

२५० बळी आणि २००० धावांसाठी लागलेले कसोटी सामने
५१ आर अश्विन
५४ सर रिचर्ड्स हेडली
५५ सर इयान बोथम व इम्रान खान
६० शेन पॉलोक