फिफा विश्वचषक: तिसऱ्या स्थानासाठी बेल्जियम – इंग्लंड आज लढणार

सेंट पीटर्सबर्ग/ रशिया।  फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडलेले बेल्जियम आणि इंग्लंड हे तिसऱ्या स्थानासाठी 14जुलैला एकमेंकाविरुद्ध लढणार आहे.

सेंट पीटर्सबर्ग स्टेडियम येथे खेळला जाणाऱ्या या सामन्याला सायंकाळी 7.30ला सुरूवात होणार आहे.

ह्या विश्वचषकात हे दोघे 28 जूनला एकमेंकाविरुद्ध खेळले होते. यामध्ये बेल्जियमने इंग्लंडला 1-0 असे पराभूत केले होते. हा विजयी गोल मिडफिल्डर अदनान जानूझॅजने केला होता.

इंग्लंडचा संघ या सामन्यात पराभूत होण्याआधी बेल्जियम विरुद्ध 21 सामन्यांपैकी फक्त एकाच सामन्यात पराभूत झाला आहे. तर 4 सामने अनिर्णीत राहिले.

फिफा विश्वचषकात हे दोघे आज चौथ्यांदा आमने-सामने येत आहेत. 1954च्या विश्वचषकात झालेला थरारक सामना 4-4 असा अनिर्णीत राहिला. तर 1990चा सामना इंग्लंडने 1-0 असा जिंकला होता.

तसेच बेल्जियम आणि इंग्लंड हे असे दोन संघ आहेत जे दोनदा विश्वचषकात दोनवेळा समोरा-समोर खेळणार आहेत. याआधी असे 2002च्या विश्वचषकात घडले होते. त्यावेळी ब्राझिल आणि तुर्की हे संघ दोन वेळा एकमेंकाविरोधात खेळले होते.

तिसऱ्या स्थानासाठी खेळण्याची बेल्जियम आणि इंग्लंडची ही दुसरी वेळ आहे.

बेल्जियम 1986च्या विश्वचषकात फ्रान्स विरुद्ध 4-2ने तर इंग्लंड 1990च्या विश्वचषकात इटली विरुद्ध 2-1ने पराभूत झाले आहेत.

बेल्जियमच्या संघाने मॅनेजर रॉबर्टो मार्टिनेझ यांच्या प्रशिक्षणाखाली 26 सामने खेळले असून यातील ते फक्त दोनच सामन्यात पराभूत झाले.

बेल्जियमने यातील पहिला सामना सप्टेंबर 2016ला स्पेन विरुद्ध 0-2 असा तर आताच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील फ्रान्स विरुद्ध 0-1 असे हे दोन सामने हरले आहेत.

सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत बेल्जियमच्या संघाने सर्वाधिक असे 14 गोल केले आहेत. त्यांच्या नंतर इंग्लंड आणि क्रोएशिया या संघांचा क्रमांक लागतो. या दोन्ही संघांनी 12 गोल केले आहेत.

तसेच खेळांडूमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये इंग्लंडचा हॅरी केन हा पहिल्या तर बेल्जियमचा रोमेलू लुकाकू दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी अनुक्रमे 6 आणि 4 गोल केले आहेत.

बेल्जियमने त्यांच्या मागील 14 विश्वचषकातील बाद फेरीत 30 गोल करून एक इतिहास रचला आहे. त्यांच्यासारखी अशी कामगिरी बाद फेरीत आतापर्यंत कोणीच केलेली नाही.

या दोन्ही संघांचा हा तिसरा विश्वचषक आहे ज्यात ते स्पर्धेशेवटी उत्कृष्ठ स्थानावर राहणार आहेत.

केन प्रमाणेच मिडफिल्डर जेस्से लिंगर्डही इंग्लंडचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याचा हा पहिलाच विश्वचषक असून त्याने पनामा विरुद्धच्या सामन्यात एक गोल केला.

बेल्जियमचा फॉरवर्ड इडन हॅझार्ड याच्याकडून या सामन्यात चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे . त्याने या स्पर्धेतील 5 सामन्यात 2 गोल केले आहे.

फिफा क्रमवारीत इंग्लंड 12व्या तर बेल्जियम 3ऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघातील खेळाडूंनी आतापर्यंत चांगला खेळ केला आहे.

संभावित संघ-

बेल्जियम- थिबाउट कोर्टॉइस, जॅन व्हर्टॉन्गें, व्हिन्सेंट कॉम्पानी, टोबी अॅल्डरवीरल्ड,
एक्सेल विस्सेल, केविन डी ब्रुने, चाडली नासरे, थॉमस मेयुएर, मारुउने फेलेनी, इडन हॅझर्ड, रोमेलू लुकाकू

इंग्लंड- जॉर्डन पिकफोर्ड, काईल वॉकर, जॉन स्टोन्स, हॅरी मॅगुइर, कीरॉन थ्रीपियर, डेल, जॉर्डन हेंडरसन, जेस्से लिंगर्ड, ऍशली यंग, रहम स्टर्लिंग, हॅरी केन