फिफा विश्वचषक: उपांत्य फेरीत आज क्रोएशिया लढणार इंग्लंडशी

मॉस्को।  फिफा विश्वचषकात आजचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना क्रोएशिया विरुद्ध इंग्लंड असा होणार आहे. लुझनीकी स्टेडियमवर खेळणाऱ्या या सामन्याला रात्रौ 11.30 सुरूवात होणार आहे.

या संघाचे एकमेंकाविरूद्ध 7 सामने झाले असून ही 8वी वेळ आहे समोरा-समोर येण्याची. यातील 4 सामने इंग्लंडने तर 2 क्रोएशियाने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

मोठ्या स्पर्धेत हे दोन संघ फक्त एकदाच विरोधात खेळले होते. 2004च्या युरो चषकात इंग्लंडने क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवला.

इंग्लंडचा हा फिफा विश्वचषकातील तिसरा उपांत्य सामना आहे. याआधी ते 1966ला पोर्तुगल विरुद्ध 2-1 असे जिंकले होते; 1990ला मात्र ते जर्मनी विरुद्ध पेनाल्टीमध्ये पराभूत झाले होते.

इंग्लंडने 1966ला झालेला विश्वचषक जिंकला आहे.

तसेच इंग्लंडने 1982 पासून अजूनही एकाच विश्वचषकात दोन युरोपिय संघाना हरवले नाही. 1982मध्ये त्यांनी चेकोस्लोव्हाकिया आणि फ्रान्स या संघांना पराभूत केले होते.

10 मधील 8 गोल वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल नोंदवले

या स्पर्धेत क्रोएशिया संघाचे 10 तर इंग्लंडचे 11 गोल

क्रोएशिया 20 आणि इंग्लंड 28 वर्षानंतर उपांत्य सामना खेळणार

या स्पर्धेत क्रोएशिया संघाने 10 गोल केले असून यात 8 वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल नोंदवले आहे. तसेच क्रोएशिया व्यतिरीक्त बेल्जियमच्या 9 खेळाडूंनी असा पराक्रम केला आहे.

हे दोन्ही संघ या सामन्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण क्रोएशिया 1998ला म्हणजेच 20 वर्षांपूर्वी आणि इंग्लंडचा संघ 28 वर्षांपुर्वी 1990ला उपांत्य सामना खेळला आहे.

या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांना आपण या स्तरावर पोहचू असे वाटले देखील नव्हते. मात्र खेळाडूंच्या अथक प्रयत्नांनी ते या फेरीपर्यंत पोहचले आहेत.

साखळी फेरीत क्रोएशियाने अर्जेंटीनाचा 3-0 अश्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. तर बाद फेरीत डेन्मार्कला(3-2) आणि यजमान रशियाला(4-3) पेन्लाटीमध्ये पराभूत केले होते.

फिफा क्रमवारीत 20 व्या क्रमांकावर असलेला क्रोएशियाने 1998ला पहिला विश्वचषक खेळला होता. यामध्ये ते स्पर्धेशेवटी तिसऱ्या स्थानावर होते.

तीन वेळचा युरो चॅम्पियनलीग विजेता मीडफिल्डर लुका मॉडरिक हा क्रोएशियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेतील 5 सामन्यात 2 गोल तर रशिया विरूद्ध महत्त्वाची एक पेनाल्टीही केली आहे.

फिफा क्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेला इंग्लंडने या स्पर्धेत एकूण 11 गोल केले आहेत.

समारा फुटबॉल अरेना येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा 2-0 पराभव करत  तब्बल 28 वर्षानंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

उपांत्य पूर्व फेरीच्या या सामन्यात इंग्लंडकडून 30 व्या मिनिटाला हॅरी मैग्यूरो आणि डेल अलीने 58 व्या मिनिटाला हेडरद्वारे अप्रतिम गोल करत इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

जिनेदिन झिदान यांच्याकडून ‘परिपूर्ण खेळाडू’ अशी स्तूती मिळवणारा इंग्लंडचा हॅरी केन हा भलताच फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेतील 4 सामन्यात सर्वाधिक 6 गोल केले आहेत.

तर क्रोएशियाच्या खेळाडूंनी जसे मेस्सीला रोखले होते तसेच आज ते इंग्लंडच्या केनला रोखणार का?

संभावित संघ-

इंग्लंड- जॉर्डन पिकफोर्ड,काईल वॉकर, जॉन स्टोन्स, हॅरी मॅगुइर, कीरॉन थ्रीपियर, डेल, जॉर्डन हेंडरसन, जेसी लिंगर्ड, ऍशली यंग, रहम स्टर्लिंग, हॅरी केन

क्रोएशिया- डॅनजेल सुबॅसिक, सिमे व्हर्शलजोको, डेजन लोव्हरेन, डोमोगेज विडा, इवान स्ट्रेंनिक, इवान रकिटिक, मार्सेलो ब्रोजोव्हिक, अँट रेबिक, लुका मॉडरिक, इवान पेरीसिक, मारियो मॅंडझूकिक