भारत-चीन फुटबॉल सामना बरोबरीत सुटला

भारत विरुद्ध चीन यांच्यात झालेल्या ऐतिहासिक फुटबॉल सामन्यात दोन्ही संघाला 0-0 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. चीनचा संघ सहज हा सामना जिंकू शकला असता पण भारतीय संघानेही उत्तम खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले.

संदेश झिंगनने भारतीय संघाचे नेतृत्व करताना 4-2-2-2च्या फॉर्मेशनने खेळाला सुरूवात केली. सामन्याच्या 15व्या मिनिटाला भारतीय डिफेंडर प्रितम कोटलने उत्तम फुटवर्क करताना एक उत्कृष्ठ शॉट मारला पण चीनच्या किपरने तो अडवला. यामुळे भारताची आघाडी घेण्याची संधी हुकली.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. पण कोणालाही गोल करण्यात यश आले नाही यामुळे पहिले सत्र हे गोलशिवायच संपले. तसेच दोन्ही संघानी गोल करण्याच्या खूप संधी सोडल्या. यावेळी झिंगनने त्याचा अप्रतिम खेळ करताना चीनला आघाडी घेण्यापासून रोखले.

दुसरे सत्र सुरू झाले असता दोन्ही संघानी त्यांचा मारा सुरूच ठेवला होता. हे सत्र संपले असता सामना 0-0 असाच होता. तसेच अतिरिक्त वेळेतही निकाल लागला नसल्याने दोन्ही 0-0 असे समाधान मानावे लागले.

तसेच भारतीय गोलकिपर गुरप्रीत सिंग संधूने या सामन्यात मोठी भुमिका पार पाडली. त्याने दुसऱ्या सत्रात चीनचा मारा योग्य रितीने परतवून लावला.

तब्बल 21 वर्षांनंतर आमने-सामने येणाऱ्या या दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात एकूण 17 सामने खेळला आहे. यामध्ये 12 विजयासह चीनचा संघ आघाडीवर होता. तसेच आज झालेला सामना हा चीन घरच्याच मैदानावर खेळत असल्याने त्यांच्या विजयाच्या सर्वाधिक संधी होत्या मात्र भारतीय संघाने आक्रमक खेळत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

फिफाच्या मैत्रीपूर्ण होणारा हा सामना दोन्ही संघासाठी जानेवारीत होणाऱ्या एएफसी एशियन कपची पूर्वतयारी सामना असणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या या एशियन कप स्पर्धेला 2019मध्ये जानेवारी महिन्यात सुरूवात होणार आहे.

फिफा क्रमवारीत भारत 97व्या तर चीन 76व्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

या वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन

नोवाक जोकोविचचा शांघाय मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रवेश

या कारणामुळे एमएस धोनी मुकणार या मोठ्या स्पर्धेला