अशी असतील भारतासाठी फिफा अंडर१७ विश्वचषकात पुढच्या फेरीत जाण्यासाठी समीकरणे

भारताचा अंडर १७ विश्वचषकातील दुसरा सामना कोलंबिया विरुद्ध झाला. या सामन्यात भारतीय संघाने खूप आश्वासक सुरुवात केली होती. परंतु दुसऱ्या सत्रात कोलंबियाने गोल करत आघाडी मिळवली. त्यानंतर भारताने गोल करत १-१ अशी बरोबरी केली, परंतु कोलंबियाने पुन्हा गोल करत हा सामना २-१ असा जिंकला.

या सामन्यात भारताने खूप चांगला डिफेन्सिव्ह खेळ केला होता, परंतु त्याच बरोबर भारताने गोल करण्याच्या खूप संधी निर्माण केल्या. कधी नशिबाने साथ दिली नाही तर कधी आपले स्ट्रायकर बॉल गोल जाळ्यात टाकण्यात अपयशी ठरले . हा सामना गमावल्याने भारताच्या राउंड ऑफ १६ मध्ये जाण्याच्या अशा जवळपास संपुष्ठात आल्या होत्या. परंतु अमेरिकेने घाना संघाला हरवल्यामुळे भारताला राऊंड ऑफ १६ मध्ये जाण्याच्या मार्ग थोडा सुकर झाला आहे.

जर भारताने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात दोन वेळचे विजेते घाना संघाचा पराभव केला आणि अमेरिकेने कोलंबियाला हरवले तर भारत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश करू शकतो.

राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठीच्या मुख्य बाबी –
# साखळी सामन्यात मिळालेले गुण
# साखळी सामन्यातील गोल डिफरन्स
# सर्व साखळी सामन्यात केलेल्या गोलची संख्या

भारताने आणि अमेरिकेने आपले दोन्ही सामने जिकंले म्हणजे भारत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश मिळवले असा होत नाही. यामध्ये गोल डिफरन्स खूप महत्वाची बाब ठरणार आहे. भारताचा सध्या-४ असा निगेटिव्ह गोल डिफरेन्स आहे. तर घाना आणि कोलंबिया यांचा गोल डिफरन्स ० आहे.

# असे असणार आहे समीकरण
भारतीय संघाने जर ३ गोलच्या फरकाने जर घाना संघाला हरवले तर भारताचा गोल डिफरन्स -१ होईल आणि घानाचा गोल डिफरन्स -३ असा होईल. हेच करून भारतीय संघाला अमेरिका आणि कोलंबिया यांच्या संघावर अवलंबून राहावे लागणार आहे.

अमेरिकेने जर कोलंबिया संघाचा २ गोलच्या फरकाने पराभव केला तर कोलंबिया संघाचा गोल डिफरन्स -२ होईल. हे सर्व समीकरण साधले तर भारताचा गोल -१, घानाचा गोल डिफरन्स -२ आणि कोलंबियाचा गोल डिफरन्स -२ असा होईल आणि भारताचा राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग सुकर होईल.