फिफा अंडर- १७ विश्वचषक २०१७: कोची मैदानावरील कामाची प्रगती पाहून क्रीडामंत्री विजय गोयल नाराज

केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कोची येथे
फिफा अंडर- १७ विश्वचषक २०१७ साठी बनविण्यात येणाऱ्या मुख्य मैदानावरील आणि सराव मैदावरील कामाची प्रगती पाहून नाराजी व्यक्त केली.

“आपण बरेच मागे आहोत. वेळापत्रकाप्रमाणे ३१ मार्च रोजी सर्व मैदानाच काम होणं अपेक्षित होत.” असं गोयल म्हणाले. त्यांनी कामाची पाहणी शुक्रवारी केली. त्यावेळी ते बोलत होते.

 

जवाहरलाल स्टेडियम हे भारतात होणाऱ्या फिफा अंडर- १७ विश्वचषक २०१७ च्या ६ मैदानांपैकी एक आहे.

फिफाच्या मैदान पाहणी करणाऱ्या समितीने गेल्या महिन्यात कोची येथे भेट देऊन एकंदरीतच कामाच्या प्रगतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच त्यांनी १५ मे ही डेडलाईन काम पूर्ण करण्यासाठी दिली आहे.

 

 

 

कोचीच्या लोकल फिफा अंडर- १७ विश्वचषक २०१७ आयोजन समितीने १५ मे पर्यंत सर्व काम पूर्ण होण्याचा विश्वास दिला होता. गोयल पुढे म्हणाल,” मी १५ मे पासून ह्या मैदानात फुटबॉल खेळायला येणार आहे. तरी तुम्हाला मैदान तयार ठेवावे लागेल. आपण एखादा प्रदर्शनी सामना तेथे घेऊ शकतो. ”


“मी ह्या मैदानाच्या एकूणच कामाच्या प्रगतीबद्दल चिंतीत आहे. पंतप्रधान मोदींना जागतिक दर्जाची हि स्पर्धा व्हावी आणि त्यासाठी सुविधाही तशाच असाव्या असे वाटते. म्हणून मी यात वैयक्तिक लक्ष घालत आहे. ” असेही गोयल पुढे म्हणाले.