अंडर-१७ फुटबॉल: ब्राझीलने कोस्टा रिकाला २-१ असे हरवत केली विजयी सुरवात

ब्राझील विरुद्ध स्पेन सामन्याकडे सर्वांचे लक्ष होते कारण दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या प्रसिद्धी आणि आपल्या खेळाच्या जोरावर अग्रेसर आहेत. ग्रुप डी मधून दोन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत.

ब्राझीलची सुरुवात हवी तशी झाली नाही. ४ मिनिटामधेच स्पेनच्या अबेल रुइझने गोल मारायचा प्रयत्न केला जो वाचवण्यात ब्राझीलचा गोलकीपर यशस्वी ठरला पण स्पेनला काॅर्नर मिळाला. ब्राझीलच्या विंगरने कॉर्नर वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो बाॅल त्यांच्याच गोल पोस्ट मधे जाऊन ओन गोल झाला आणि स्पेन ने ०-१ अशी आघाडी घेतली.

पण ही आघाडी जास्त वेळ नाही टिकू शकली. २६ व्या मिनिटाला लिंकोलनने उजव्या पायाने उजव्या कोपऱ्यात खाली बाॅल टाकत गोल केला. पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत ४५+१ मिनिटाला ब्राझीलच्या पाॅलीन्होने गोल पोस्टच्या मधे वरच्या बाजूला मारत २-१ अशी बढत मिळवून दिली.

दुसऱ्या हाफला दोन्ही संघांनी आक्रमक पवित्रा घेतला. स्पेनने खूप प्रयत्न केले पण त्याचे गोल मधे रुपांतर नाही करु शकले. स्पेन आणि ब्राझील दोघांनी एकूण १० वेळा प्रयत्न केले त्यात ब्राझील ने ५ तर स्पेन ने ३ वेळा बाॅल गोल च्या दिशेने मारला.

स्पेनला तब्बल ११ काॅर्नर मिळाले. तर ब्राझीलला केवळ १. दुसऱ्या ग्रुप सीच्या सामन्यात जर्मनीने कोस्टा रीकाचा २-१ ने पराभव केला. जर्मनीने २१ आणि ८९ व्या मिनिटाला तर कोस्टा ने ६४ व्या मिनिटाला गोल केला.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)