असा पार पडला फिफा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा

गुरुवार, 14 जूनपासुन 21 व्या फुटबॉल विश्वचषकाला रशियात सुरवात झाली आहे. फिफा विश्वचषकातील पहिला सामना रशिया आणि सौदी आरेबिया यांच्यात झाला. हा सामना सुरू होण्याआधी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.

ब्राझिलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो आणि ब्रिटिश पॉप स्टार रॉबी विलियम्स यांच्या उपस्थितित हा सोहळा पार पडला.

या सोहळ्यात रॉबी विलियम्सने रशियन सोप्रानो आयडा गरफुलीना बरोबर परफॉर्मन्स केला. याबद्दल रॉबी विलियम्स म्हणाला, फिफा विश्वचषकात परफॉर्म करणे माझे बालपणीचे स्वप्न होते. माझ्यासाठी हा न विसरणारा शो ठरला आहे.

फिफा विश्वचषक 2018 ची सुरुवात झाली आहे हे सांगण्यासाठी एक प्रतिकात्मक पहिली किक म्हणून रोनाल्डो आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या लहान मुलाने झबीवाका नाव असणाऱ्या शुभंकरकडे बॉल पास केला.

मात्र ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले आजारी असल्याने ते या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहित.

मागील फिफा विश्वचषकांप्रमाणेच यावेळीही उद्घाटन सोहळ्यात म्युझीकल परफॉर्मन्सवर भर होता.