फिफा विश्वचषक: फ्रान्सच्या पोग्बाने उपांत्य फेरीचा विजय गुहेतून सुटका झालेल्यांना समर्पित केला

रशिया।  फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोग्बाने 10 जुलैला झालेला उपांत्य फेरीतील संघाचा विजय थाईलंडमधील गुहेतून सुटका झालेल्या 12 मुलांना समर्पण केला आहे.

फिफा विश्वचषक 2018 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य फ्रान्सने बेल्जियमचा 1-0 असा पराभव  करत अंतिम फेरीत धडक मारली.

मॅंचेस्टर युनायटेडचा मिडफिल्डर पोग्बाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून, “हा विजय मी या दिवसाचे खऱ्या नायकांना समर्पित करत आहे”, असे ट्विट केले.

मंगळवारी अजून 5 मुलांची गुहेतून सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. शालेय मुलांचा हा फुटबॉल संघ सुमारे 18 दिवस थायलंडच्या गुहेत अडकला होता.

या शोध मोहिमेत एलिट परदेशी डायवर्स आणि थाई नेव्हीने मोलाची भुमिका पार पाडली आहे. शेवटच्या वेळी त्यांनी आणखी 4मुले आणि त्यांचे प्रशिक्षक यांची सुटका केली.

तसेच या शाळेच्या फुटबॉल संघाला फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅटिनो यांनी थायलंड फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र लिहुन 15 जुलैला होणारा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्याचे निमंत्रण दिले आहे.

“आम्हाला 23 जूनला समजले की थायलंडमधील गुहेत बारा फुटबॉलपटू आणि त्यांचे प्रशिक्षक अडकले आहेत. आम्हाला आशा आहे की या मुलांची सुखरुप सुटका होईल.” थायलंड फुडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षांना लिहलेल्या पत्रात गियानी इन्फॅटिनो म्हणाले.

मात्र या मुलांना डॉक्टरांनी सुरक्षतेसाठी प्रवास टाळण्यास सांगितल्यामुळे या मुलांच्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यास जाण्यावर प्रश्नचिन्ह होते.

यावर फिफाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “मुलांचे जीवन सुरक्षित असणे ही महत्त्वाची बाब आहे. यामुळे ही मुले मॉस्कोत होणाऱ्या सामन्यास अनुपस्थित राहणार आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

क्रोएशियाच्या स्ट्रायकरने भरले सामना पहायला आलेल्या चाहत्यांचे 3000 पौंडचे बील

फिफा विश्वचषक: इंग्लंड प्रशिक्षकाच्या वेस्टकोटसारखे कोट ‘सोल्ड आउट’