अर्जेंटीनाच्या फुटबाॅल चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी नाही

अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू मॅन्युएल लॅनझिनी ह्याला झालेल्या दुखापतीमुळे तो फिफा विश्वचषक 2018 ला मुकणार आहे. शुक्रवारी झालेल्या सराव सामन्यात त्याला गुडघ्याला दुखापत झाली.

वेस्ट हॅमचा मिडफिल्डर लवकर बरा व्हावा म्हणून त्याच्या संघ सहकाऱ्यानी ‘फोर्स मॅनू’च्या नावाने सोशल मिडीयावर काही पोस्ट केल्या आहेत.

आधीच अर्जेंटीना जेरूसलेममधील घटनांना तोंड देत आहे. त्यात या संघाचा सराव सामना जेरूसलेममध्ये इस्राईल विरूध्द होणार होता. मात्र काही राजकीय कारणांनी तो रद्द करण्यात आला.

1978 आणि 1986 ह्या दोन वेळेचा विश्वचषक विजेता अर्जेंटीनाचा पहिला सामना 16 जूनला होणार आहे.  त्यांचा हा सामना आईसलॅंड विरूध्द होणार आहे.

तसेच अर्जेंटीनाचे बाकीचे ग्रुप सामने 21 जूनला क्रोएशिया आणि 26 जूनला नायजेरिया विरूध्द होणार आहेत.

Mucha Fuerza @manulanzini #FuerzaManu

A post shared by Javier Mascherano (@mascherano14) on