फिफा विश्वचषक २०१८- ओळख ब गटाची

-नचिकेत धारणकर

पोर्तुगाल आणि स्पेन सारख्या बलाढ्य संघांचा समावेश असलेलया ब गटात त्यांच्या बरोबर मोरोक्को आणि इराण संघाचा समावेश आहे. तब्बल २० वर्षांनी मोरोक्को संघ विश्वचषकास पात्र ठरला असून ते स्पेन किंवा पोर्तुगालला पराभवाचा धक्का देऊ शकतात. स्पेनचा संघ विश्वचषकातील काही परिपूर्ण संघांपैकी एक संघ आहे तर पोर्तुगाल संघाची मदार त्यांचा खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोवर असेल.

पोर्तुगाल :- जागतिक क्रमवारी ४
फुटबॉलजगतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक समजला जाणारा पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे यावर्षी सर्वांना त्यांच्याकडून खास कामगिरीची अपेक्षा आहे. पेपे, बेर्नांडो सिल्वा यांच्यावर सुद्धा सर्वांचे लक्ष असेल. पोर्तुगालच्या बचावफळीत असलेले खेळाडू पेपे, ब्रुनो अल्वेस यांचे वय ३५ पेक्षा जास्त आहे.

सामन्यांचे वेळापत्रक :- पोर्तुगाल विरुद्ध
१६ जून स्पेन
२० जून मोरोक्को
२५ जून इराण

विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- ३रे स्थान (१९९६ इंग्लंड)
विश्वचषकातील प्रदर्शन :- २६ सामने १३ विजय ९ पराभव तर ४ सामने ड्रॉ.
पोर्तुगालने विश्वचषकात एकूण ४३ गोल्स केले असून २९ गोल्स त्यांच्या विरुद्ध झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
आफ्रिका (२०१०) :- अंतिम १६ संघात प्रवेश
जर्मनी (२००६) :- ४थे स्थान
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.

मॅनेजर :- फर्नांडो सॅटोस
प्रमुख खेळाडू :- ख्रिस्तीयानो रोनाल्डो
संभाव्य रचना :- ४-४-२

स्पेन :- जागतिक क्रमवारी ८
ला लीगच्या सर्वोत्तम खेळाडूंची यादी पाहिली तर सर्व प्रकारचे उत्कृष्ट खेळाडू विश्वचषकात स्पेनतर्फे खेळतात. युरोपच्या दोन सर्वोत्कृष्ट संघ बार्सिलोना आणि रिअल माद्रिदचे मिश्रण म्हणजे स्पेनचा संघ. परिपूर्ण समजल्या जाणाऱ्या या संघात डेव्हिड डी गे, जेरार्ड पिके, सिर्गिओ रामोस, अल्बा, इनिएस्टा, बुस्केट, डेव्हिड सिल्वा, डिएगो कोस्टा, इस्को, असेन्सिओ अश्या मातब्बर खेळाडूंचा भरणा आहे. २०१०च्या विश्वचषकात विजयी गोल करणाऱ्या इनिएस्टाचा हा शेवटचा विश्वचषक आहे. त्यामुळे हा विश्वचषक जिंकून इनिएस्टाला निरोप द्यायचा स्पेनचा मानस असेल.

सामन्यांचे वेळापत्रक :- स्पेन विरुद्ध
१६ जून पोर्तुगाल
२१ जून इराण
२६ जून मोरोक्को

विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- विजेते (२०१० आफ्रिका)
विश्वचषकातील प्रदर्शन :- ५९ सामने २९ विजय १८ पराभव तर १२ सामने ड्रॉ.
स्पेनने विश्वचषकात एकूण ९२ गोल्स केले असून त्यांच्या विरुद्ध ६६ गोल्स झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
दक्षिण आफ्रिका (२०१०) :- विजेते
जर्मनी (२००६) :- अंतिम १६ संघात प्रवेश
दक्षिण कोरिया आणि जपान (२००२) :- अंतिम ८ संघात प्रवेश

मॅनेजर :- ज्युलन लोपेटेगुई
प्रमुख खेळाडू :- रामोस, इनिएस्टा
संभाव्य रचना :- ४-३-३

मोरोक्को :- जागतिक क्रमवारी ४२
मोरोक्कोने विश्वचषकात प्रवेश मिळवताना पात्रता फेरीत विरोधी संघाला एकसुद्धा गोल करू दिला नाही. यावरून त्यांच्या बचावफळीतील ताकद दिसून येते आणि हाच त्यांचा प्रमुख अस्त्र असेल स्पेन आणि पोर्तुगालला रोखण्यासाठी. त्याबरोबरच डच फुटबॉलर चा किताब पटकावणाऱ्या हकीम झियेचवर सुद्धा सर्वांचे लक्ष असेल.

सामन्यांचे वेळापत्रक :- मोरोक्को विरुद्ध
१५ जून इराण
२० जून पोर्तुगाल
२५ जून स्पेन

विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- अंतिम १६ संघात प्रवेश (१९८६ मेक्सिको)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १३ सामने २ विजय ७ पराभव तर ४ सामने ड्रॉ.
मोरोक्कोने विश्वचषकात एकूण १२ गोल्स केले असून त्यांच्या विरुद्ध १८ गोल्स झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
फ्रान्स (१९९८) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
अमेरिका (१९९४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
मेक्सिको (१९८६) :- अंतिम १६ संघात प्रवेश
मेक्सिको (१९७०) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.

मॅनेजर :- हॅर्वे रेनार्ड
प्रमुख खेळाडू :- हकीम झियेच
संभाव्य रचना :- ४-५-१

इराण :- जागतिक क्रमवारी ३६
सर अॅलेक्स फर्ग्युसन यांच्याबरोबर काम केलेले कार्लोस क्युइरोज इराणचे मॅनेजर आहेत आणि त्यांनी इराणला लागोपाठ २ विश्वचषकासाठी पात्र ठरवले आहे. इराणचा संघ त्यांच्या बचावफळी आणि विंगर्सच्या प्रतिहल्ल्यावर जास्त अवलंबून आहे. हाच त्यांचा मजबूत पक्ष आहे पण यामुळे त्यांच्या आक्रमणात कमतरता जाणवते. अलीरेझा जहांबक्ष हा यावेळेस त्यांच्या आक्रमणाचा प्रमुख केंद्र असेल. या वर्षीच्या नेदरलँडचा गोल्डन बूटचा किताब पण यानेच पटकावला आहे.

सामन्यांचे वेळापत्रक :- इराण विरुद्ध
१५ जून मोरोक्को
२० जून स्पेन
२५ जून पोर्तुगाल

विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी :- साखळी फेरी (१९७८, १९९८, २००६, २०१४)
विश्वचषकातील प्रदर्शन :- १२ सामने १ विजय ८ पराभव तर ३ सामने ड्रॉ.
इराणने विश्वचषकात एकूण ७ गोल्स केले असून त्यांच्या विरुद्ध २२ गोल्स झाले आहेत.
मागील ४ पात्र ठरलेल्या विश्वचषकातील कामगिरी :-
ब्राझील (२०१४) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
जर्मनी (२००६) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
फ्रान्स (१९९८) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.
अर्जेन्टिना (१९७८) :- साखळी फेरीतच आव्हान संपले.

मॅनेजर :- कार्लोस क्युइरोज
प्रमुख खेळाडू :- अलीरेझा जहांबक्ष
संभाव्य रचना :- ४-३-३