तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत कॉग्निझंट संघाचा मोठा विजय

पुणे। राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत कॉग्निझंट संघाने वोडाफोन संघाचा 9-0 असा एकतर्फी मोठा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. नैनान के व राहूल छाबडा यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाचा डाव भक्कम केला.

मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रकाश थोरातच्या एका गोलाच्या बळावर फिनआयक्यु संघाने टीसीएस संघाचा 1-2 असा पराभव करत आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखले. अंकीत सहाच्या दोन गोलांच्या जोरावर बार्कलेज संघाने विप्रो संघाचा 3-0 असा पराभव केला तर अॅमडॉक्स संघाने हनिवेल संघाचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फिनआयक्यु – 1(प्रकाश थोरात 12मी) वि.वि टीसीएस-0

बार्कलेज- 3(अंकीत सहा 9,16मी, सोनु वलाईल 19मी) वि.वि विप्रो-0

अॅमडॉक्स – 3(विमल कंदुरी 10मी, प्रिताज देवल 14मी, विनित कोद्रे 17मी) वि.वि हनिवेल-1(एल्डोे अब्राहीम 15मी)

कॉग्निझंट- 9(स्नेहल ठाकुर 4मी, नैनान के 7,12मी, सौरभ मुळीक 10मी, सौमील वावीकर 14मी, आदित्य देसाई 16मी, राहूल छाबडा 5,18मी, विलियम फर्रांडीझ 20मी) वि.वि वोडाफोन-0

केपीआयटी-1(देबज्योती सेन 15मी) वि.वि अमेझॅन- 0

महत्त्वाच्या बातम्या:

-पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत बीआयपीएल रायजिंग ईगल्स, टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज संघांची विजयी सलामी 

-पाँटिंगच्या मते स्टीव्ह स्मिथ खेळत नसल्याने हा खेळाडू आहे सर्वोत्तम!

-मैदानात पाऊल ठेवताच किंग कोहलीच्या नावावर विराट विक्रम