विश्वचषक टीम इंडियाचा पण चर्चा फक्त द्रविडची

भारतीय संघाने ६ वर्षांनी पुन्हा १९ वर्षाखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले. हे करताना संघाने चौथ्यांदा हा विश्वचषक जिंकला. या संघातील गुरु शिष्य अर्थात प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार पृथ्वी शॉ यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती.

परंतु नंतर पृथ्वीचे नाव मागे पडत शुभमन गिलचे नाव पुढे आले ते त्याने केलेल्या कामगिरीमुळे. त्याने या संपूर्ण मालिकेत ४ अर्धशतके केली. परंतु आज जेव्हा भारत विश्वचषक जिंकला तेव्हा राहुल द्रविडच्या नावाची मोठी चर्चा झाली.

विशेष म्हणजे २०१६ सालीही भारतीय संघ १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेला होता परंतु विंडीजकडून पराभूत झाला होता. परंतु आज २००३ मध्ये झालेल्या पराभवाचा द्रविडने एक प्रशिक्षक म्हणून वचपा काढलाच.

याचकारणामुळे द्रविड आज ट्विटर आणि अन्य माध्यमांवर ट्रेंडिंग होता. अनेक क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील दिग्गजांनी द्रविडचे अभिनंदन केले आहे.

याचकामगिरीमुळे बीसीसीआयने द्रविडला प्रशिक्षक म्हणून ५० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.