पंचांवर ओरडणं जगातील सर्वात दिग्गज अष्टपैलू खेळाडूला पडले चांगलेच महागात

सिलहेत। बांगलादेश विरुद्ध विंडीज यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात विंडीजने 8 विकेट्सने सामना जिंकत तीन टी20 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.

या सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला आयसीसीने 15 टक्के दंड ठोठावला आहे. तसेच त्याला एक डिमेरिट पॉइंटही मिळाला आहे.

बांगलादेशच्या फलंदाजीवेळी 14व्या षटकात टाकलेल्या चेंडूला पंचांनी वाइड बॉल न दिल्याने शाकिबने नाराजी व्यक्त केली होती.

यावेळी शाकिब पहिल्यांदा पंचावर ओरडला. तसेच तो त्यावर न थांबता तर पुढे चर्चाही करत होता, असे आयसीसीने सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

शाकिबने ही चूक मान्य केली असून त्याला केलेला दंडही मान्य केला आहे. यामुळे या घटनेसाठी अधिकृत चर्चेची गरज नाही. त्याचा हा दुसरा डिमेरिट पॉइंट असून यावर्षी मार्च महिन्यात श्रीलंका विरुद्ध टी20 झालेल्या सामन्यातही त्याला असभ्य वर्तनामुळे डिमेरिट पॉइंट मिळाला होता.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बांगलादेश सर्वबाद 129 धावाच करू शकला. तर शाकिबने 43 चेंडूत 61 धावा केल्या.

हा सामना विंडीजने 55 चेंडू शिल्लक असताना 8 विकेट्सने जिंकला. यामध्ये सामनावीर शेल्डन कोट्रेलने चार षटकात 28 धावा देत चार विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या:

…तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीची होणार सुट्टी

अशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल

टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या पुरुषांच्या दुहेरीत बोपन्ना-दिवीज जोडी खास आकर्षण