संपूर्ण यादी: या खेळाडूंनी आपल्या संघांसाठी झळकावले आहे पहिले वहिले कसोटी शतक

आजपासून(5 सप्टेंबर) सुरु झालेल्या बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान संघात एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात रेहमत शहाने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून शतक करणारा इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

त्याने या सामन्यात  187 चेंडूत 102 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्या या शतकामुळे आयसीसीचे कसोटी सदस्य असणाऱ्या सर्व 12 देशांच्या नावावर आता किमान एक तरी शतकाची नोंद झाली आहे.

आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके इंग्लंडने केली आहेत. त्यांनी 868 शतके केली आहेत. त्यांच्यापाठोपाठ 852 शतकांसह ऑस्ट्रेलिया आहे. भारत या यादीत 508 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तानचा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा तिसराच सामना आहे. याआधी खेळलेल्या दोन्ही कसोटी सामन्यात त्यांच्याकडून एकाही क्रिकेटपटूला शतकी खेळी करता आली नव्हती. पण आज रेहमत शहाने शतकी खेळी करत अफगाणिस्तानच्या खात्यात पहिले कसोटी शतक जमा केले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक संघासाठी पहिले शतक करणारे क्रिकेटपटू – 

ऑस्ट्रेलिया – चार्ल्स बॅनरमॅन

इंग्लंड – डब्ल्यूजी ग्रेस

दक्षिण आफ्रिका – जीमी सिनक्लेअर

वेस्ट इंडीज – क्लिफर्ड रोच

न्यूझीलंड – स्टिव्ही डेम्पस्टर

भारत – लाला अमरनाथ

पाकिस्तान – नझर मोहम्मद

श्रीलंका – सिदथ वेट्टीमुनी

झिम्बाब्वे – डेव हॉफटन

बांगलादेश – अमिनुल इस्लाम

आयर्लंड – केविन ओब्रायन

अफगाणिस्तान – रेहमत शहा

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

अफगाणिस्तानला मिळाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर!

जेव्हा स्टिव्ह स्मिथ क्रिकेटच्या चेंडूवरच नाही तर बीच बॉलवरही मारतो चौकार, पहा व्हिडिओ

चक्क स्टंप्सवर बेल्स नसतानाही सुरु राहिला चौथा ऍशेस कसोटी सामना!