फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा: आजच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

मुंबई | आजपासून फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा २०१८ला जोगेश्वरी येथील एसआरपीएफ मैदान येथे सुरुवात होत आहे. आज स्पर्धेत एकूण ४ सामने होणार असून त्यात पुरुष गटातील २ लढती तर महिला गटातील दोन लढतींचा समावेश आहे.

पुरुष आणि महिला गटाचे आजचे सामने रात्री ८ वाजता सुरु होणार असून महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा पहिला सामना ८ वाजता उत्तरप्रदेश संघासोबत आहे तर पुरुष गटातील दुसरा सामना ९ वाजता कर्नाटक आणि उत्तराखंड संघात होणार आहे.

महिला गटात सायली जाधवच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र फेडरेशन कपमधील आपले अभियान सुरु करणार असून ८ वाजता ही लढत केरळ संघाशी होईल. महिलांच्या दुसऱ्या लढतीत ९ वाजता उत्तरप्रदेश संघ छत्तीसगढ संघाशी दोन हात करेल.

फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा २०१८ (दिवस पहिला)

पुरुष गट –
सायं. ८ वा. – महाराष्ट्र वि. उत्तर प्रदेश
सायं. ९ वा. – कर्नाटक वि उत्तराखंड

महिला गट –
सायं. ८ वा – महाराष्ट्र वि केरळ
सायं. ९ वा -उत्तर प्रदेश वि छत्तिसगड