दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले

दिल्ली | राजस्थान राॅयल्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स सामन्यात काल दिल्लीने राजस्थानचा डकवर्थ लुईस नियमाने ४ धावांनी पराभव केला. हा सामना आय़पीएलमध्ये कायम स्मरणात रहाणारा सामना ठरणार आहे. 

याला कारण ठरली ती भारतीय क्रिकेटमधील यंग ब्रिगेड. कालच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेविल्सने १७.१ षटकांत चक्क १९६ धावा केल्या. यातील १६६ धावा केल्या त्या पृथ्वी शाॅ, रीषभ पंत आणि श्रेयस अय्यर या त्रिकुटाने. 

या तिघांचेही वय २३ वर्षांपेक्षा कमी आहे. पृथ्वी शाॅ १८,  रीषभ पंत २० तर श्रेयस अय्यर २३ वर्षांचा आहे. 

आयपीएल इतिहासात एकाच सामन्यात २३ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या तीन खेळाडूंनी ४० पेक्षा जास्त धावा करायची कालची पहिलीच वेळ होती. 

सलामीवीर पृथ्वी शाॅने २५ चेंडूत ४७, चौथ्या क्रमांकावर आलेल्या रीषभ पंत २९ चेंडूत ६९ तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर ३५ चेंडूत ५० धावा केल्या. 

केवळ चार सामन्यात मिळून पृथ्वी शाॅने ८४ चेंडूत १४० धावा केल्या आहेत तर २१ वय पुर्ण होण्यापुर्वी आयपीएलमध्ये ६ शतके करणारा रीषभ पंत हा पहिला खेळाडू ठरला आहे. 

संघातील अन्य मोठे खेळाडू फ्लाॅप ठरत असताना या यंग ब्रिगेडने दिल्ली डेअरडेविल्सच्या आयपीएल २०१८च्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!

राॅजर फेडररची का होतेय आज मोठी चर्चा?

मलिंगाला श्रीलंकाकडून खेळण्यापेक्षा मुंबई इंडियन्स प्रिय

धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल!

Video- कोहली फॅन्सकडून सचिनच्या चाहत्यांना जोरदार प्रतित्तोर