मुंबईत वनडे सामन्याची तिकीटविक्री आजपासून सुरु

मुंबई। भारत २२ ऑक्टोबर पासून न्यूझीलंड विरुद्ध ३ वनडे आणि ३ टी २० सामने खेळणार आहे. त्यातील पहिला वनडे सामना मुंबईला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठीची तिकीट विक्री आजपासून सुरु झाली.

उद्या दुपारी १ वाजता तिकीट विक्रीला सुरुवात झाली. www.bookmyshow.com या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट विक्री उपलब्ध आहे. तर प्रत्यक्ष विक्री वानखेडे स्टेडिअमवर होईल.

ऑनलाईन तिकीटांचे दर हे ७५० रुपये, १५०० रुपये, ३०००रुपये, ४००० रुपये आणि २५हजार रुपये आहे.

भारतीय संघ या मैदानावर आजपर्यंत १७ अंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळाला असून त्यातील १० सामने जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध एकही सामना या मैदानावर झाला नाही.

भारत आणि न्यूझिलंड यांच्यात तीन सामान्यांची वनडे मालिका होणार असून त्या पुणे,मुंबई आणि कानपुर येथे सामने होतील.