आज दोन खेळाडू लॉर्ड्सवर कर्णधार म्हणून करणार पदार्पण

आज ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर दोन खेळाडू कर्णधार म्हणून आपला पहिलाच सामना खेळनार आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामान्यांची कसोटी मालिका आजपासून सुरु होत आहे.

कर्णधार म्हणून जो रूटचा हा पहिलाच सामना असून २६ वर्षीय रूट यापूर्वी त्याने ५३ कसोटी सामन्यांत ५२.८० च्या सरासरीने ४५९४ धावा केल्या आहेत. यात त्याने ११ शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत. तो इंग्लंडचा ८० वा कसोटी कर्णधार असेल.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार फाफ डुप्लेसीने कौटुंबिक कारणामुळे माघार घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेकडून नवीन कर्णधार म्हणून डीन एल्गारची निवड झाली आहे. त्याचाही हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असेल.

एल्गारने आफ्रिकेकडून ३५ कसोटी सामन्यांत ३९.२५च्या सरासरीने २००२ धावा केल्या आहेत. तसेच या ३० वर्षीय खेळाडूने १३ विकेट्सही घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आफ्रिकेचा नेतृत्व करणार तो एकूण ३६वा कर्णधार ठरणार आहे तर १९९२ मध्ये आफ्रिकेवरील बंदी उठवल्यांनंतरचा तो केवळ १२ वा कसोटी कर्णधार आहे.