जून महिन्यात भारतीय क्रिकेटमध्ये घडला अजब विक्रम

बेंगलोर | आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान हा कसोटी सामना सध्या सुरु आहे. भारतात प्रथमच जून महिन्यात कसोटी सामना होत आहे.

भारतीय संघ २६५ पेक्षा जास्त कसोटी सामने भारतात खेळला आहे. परंतु यापुर्वी कधीही कोणताही सामना जून, जूलै आणि मे महिन्यात झाला नाही.

परंतु या सामन्यामुळे प्रथमच हा सामना भारतात जून महिन्यात होत आहे.

भारतात जून, जूलै महिन्यात पावसाचा हंगाम असतो तर मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर उन्हाळा असतो. त्यामुळे या महिन्यांत एकतर भारतीय संघ मर्यादीत षटाकांचे क्रिकेट खेळायला प्राधान्य देतो किंवा परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी प्राधान्य देतो.