५३० कसोटी सामने खेळलेल्या टीम इंडियाने पहिल्यांदाचा केला असा कारनामा

अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ४ विकेट्स केवळ ४१ धावांवर गमावल्या होत्या. ४ विकेट्स ५० धावा होण्यापुर्वीच गमावलेल्या असताना भारतीय संघ आजपर्यंत परदेशात कधीही कसोटी सामना जिंकला नव्हता.

भारतीय संघ आजपर्यंत ५३० पैकी २६३ सामने परदेशात खेळला आहे. या २६३ सामन्यांपैकी काही सामन्यात परदेशात ५० धावा होण्यापुर्वी संघाने ४ विकेट गमावलेल्या असताना कधीही विजय मिळवला नव्हता.

भारताची पहिल्या डावात अतिशय खराब अवस्था झालेली असताना चेतेश्वर पुजाराने संघाचा डाव सावरला होता. तसेच त्याने पहिल्या डावात शतकी तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

अॅडलेड कसोटीत यष्टीरक्षक रिषभ पंत चमकला, केले हे खास विक्रम