वनडे क्रिकेटच्या इतिहासात अशी गोष्ट पहिल्यांदाच घडली

मँचेस्टर। 2019 क्रिकेट विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला उपांत्य सामना आज राखीव दिवशी सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी 50 षटकात 240 धावांचे आव्हान ठेवले आहे.

पण या धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली होती. त्यांनी रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांच्या विकेट्स चार षटकांच्या आत 5 धावांवर असतानाच गमावल्या.

विशेष म्हणजे हे तिघेही प्रत्येकी 1 धाव करुन बाद झाले. त्यामुळे वनडे क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की एका संघाचे पहिले तीन फलंदाज प्रत्येकी 1 धाव करुन बाद झाले.

या सामन्यात हे तिघे बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत स्थिरावल्यासारखे वाटत होते. पण कार्तिकने 6 धावांवर विकेट गमावली. त्यानंतर पंत आणि हार्दिक पंड्याने पाचव्या विकेटसाठी 47 धावांची भागीादारी रचत भारताचा डाव सांभाळला होता.

मात्र पंत 32 धावा करुन झेलबाद झाला. त्याच्या नंतर काही वेळातच पंड्याही 32 धावा करुन बाद झाला. त्यामुळे भारताची आवस्था 6 बाद 92 धावा अशी झाली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रविंद्र जडेजाने जबरदस्त थ्रो करत केले रॉस टेलरला धावबाद, पहा व्हिडिओ

संघात एकवेळ स्थान न मिळालेल्या जडेजाने संघासाठी वाचवल्या ४१ धावा

लिटिल मास्टर गावसकरांचे चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले होते केस!