इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम

नॉटिंगघम। इंग्लड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक खास विक्रम झाला आहे.

या सामन्यात चारही डावात पहिल्या पाच फलंदाजांनी दोन अंकी धावसंख्या पार केली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात चारही डावात पहिल्या पाच खेळाडूंनी 10 पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या सामन्यात भारताकडून पहिल्या आणि तिसऱ्या डावात शिखर धवन, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रत्येकी दोन अंकी धावसंख्या पार केली होती.

तर इंग्लंडकडून दुसऱ्या डावात अॅलिस्टर कूक, केटन जेनिंग्ज, कर्णधार जो रुट, आॅली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांनी तर चौथ्या डावात अॅलिस्टर कूक, केटन जेनिंग्ज, कर्णधार जो रुट, आॅली पोप आणि बेन स्टोक्सने दोन अंकी धावसंख्या पार केली आहे.

या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 521 धावांचे आव्हान ठेवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?

केवळ ६ धावा आणि क्रिकेट जगतातील सर्वात खास विक्रम कोहलीच्या नावे

लारा, ब्रॅडमन, पाॅटींग… सर्वांचे विक्रम किंग कोहलीने मोडले