…तरच टीम इंडिया घडविणार तिसऱ्या कसोटीत इतिहास

नॉटिंगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडे २९२ धावांची मोठी आघाडी आहे.

इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावांतच कोलमडला. यामुळे भारताने पहिल्या डावात १६८ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाखेर २ बाद १२४ धावा केल्या.

या सामन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या डावात सलामीवीरांनी ६० धावांची अर्धशतकी सलामी दिली.

केएल राहुल आणि शिखर धवन जोडीने पहिल्या डावात ६० आणि दुसऱ्या डावातही ६० धावा पहिल्या विकेटसाठी केल्या.

यामुळे एका खास विक्रमाची नोंदही झाली. दोन्ही डावात सलामीवीरांनी अर्धशतकी भागीदारी करण्याचा पराक्रम भारतीय संघाने इंग्लंड, आस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका किंवा न्युझीलंड देशांत केवळ चौथ्यांदा केला.

यापुर्वी १९३६मध्ये मुश्ताक अली आणि विजय मर्चंट यांनी ओव्हल कसोटीत, १९६८मध्ये फारुक इंजिनीअर आणि अबिद अली यांनी सिडनी कसोटीत तर १९८६मध्ये सुनिल गावसकर के श्रीकांत यांनी एजबस्टन कसोटीत हा पराक्रम केला होता.

त्यातील ओव्हल आणि सिडनी कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला होता. तर एजबस्टन कसोटी अनिर्णित राहिली होती.

सध्या सुरु असलेल्या नॉटिंगघम कसोटीत भारताकडे सामना जिंकण्याची मोठी संधी आहे. जर या सामन्यात संघाने विजय मिळवला तर दोन्ही कसोटीत अर्धशतकी सलामी दिल्यावर या चार देशांमधील एका देशात भारताचा हा पहिलाच विजय ठरणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

तिसरी कसोटी: भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडची फलंदाजी कोलमडली; पंड्याच्या पाच विकेट्स

आॅस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूची सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती