प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धा: इंडियन बँक, अ‍ॅटॉससिंटेल संघाचे विजय

पुणे। इंडियन बँक आणि अ‍ॅटॉससिंटेल या संघांनी प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत इंडियन बँक संघाने आयरिसर्च संघावर ४१ धावांनी मात केली. इंडियन बँकेने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६३ धावा केल्या. यात सौरभकुमारने ५० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५७, तर विजय के. याने ३३ चेंडूंत ५ षटकार व ३ चौकारांसह ५२ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांनी निराशा केली. लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिसर्च संघाचा डाव १८.४ षटकांत १२२ धावांत आटोपला. आयरिसर्च संघाकडून अक्षय खोडेने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली.

दुस-या लढतीत अ‍ॅटॉससिंटेल संघाने टी कनेक्टिव्हिटी संघावर पाच गडी राखून मात केली. टी कनेक्टिव्हिटी संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १६१ धावा केल्या. अ‍ॅटॉससिंटेल संघाने विजयी लक्ष्य ५ गडींच्या मोबदल्यात १७.५ षटकांतच पूर्ण केले. यात अभिजित परिदाने ३८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७३, तर सौरभ मंजरामकरने ४१ चेंडूंत ४९ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक – १) इंडियन बँक – २० षटकांत ८ बाद १६३ (सौरभकुमार ५७, विजय के. ५२, अशोक अय्यर २-४०, अभिषेकसिंग १-२८) वि. वि. आयरिसर्च – १८.४ षटकांत सर्वबाद १२२ (अक्षय खोडे ४०, अभिषेकसिंग २१, विश्वजित उधन २-१३, विजय के. १-११).
२) टी कनेक्टिव्हिटी – २० षटकांत ८ बाद १६१ (अबिल अली ४५, कौस्तव सर्मा ३५, अमित बोधाने २३, यमनप्पा गड्डी २१,शिवराज पिसाळ २-२१, जय मेहता १-३२, संकेत त्रिवेदी १-३५, सौरभ मंजरामकर १-२२) पराभूत वि. अ‍ॅटॉससिंटेल – १७.५ षटकांत ५ बाद १६२ (अभिजित परिदा ७३, सौरभ मंजरामकर ४९, अमित बोधाने ३-३०).